Water Supply With Tanker

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

बातम्या

water supply With Tanker । यंदा जून महिन्यात मान्सूनने उशिरा हजेरी लावली त्यानंतर जुलैमध्ये थोड्याफार प्रमाणात बरसला आणि ऑगस्टमध्ये तर पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. सध्या सप्टेंबर महिना चालू झाला असून सप्टेंबर महिन्यामध्ये देखील म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने अनेक छोटे मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्याच्या अनेक भागात शासकीय तसेच खाजगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

माहितीनुसार, राज्यातील 2195 गाव आणि वाड्यांवर 481 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यामध्ये 432 गाव आणि १७६७ वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे सर्वात जास्त टँकर हे पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. 97 टँकर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात सुरू आहेत. मागच्या आठवड्यात 468 टँकर राज्यात सुरू होते मात्र आता आठवड्याभरात 13 टँकरची यामध्ये भर पडली आहे.

सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाले आहे याच गोष्टीचा विचार करून सरकारकडून देखील अनेक भागांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान पुणे विभागात देखील पण्याची भिषण टंचाई असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण 40 गावं आणि 289 वाड्यांवर 51 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू?

पुणे- 51
अहमदनगर – 86
सातारा – 97
सांगली – 37
सोलापूर – 15
छत्रपती संभाजीनगर – 59
बुलढाणा – 01
यवतमाळ – 01
नाशिक – 81
धुळे – 01
जळगांव – 17
जालना – 36

एकूण = 481

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *