Washim News

Washim News | धक्कादायक! कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन संपवले जीवन

बातम्या

Washim News | सध्या राज्यभर पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणांसाठी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र आता पावसाच्या लहरीपणामुळे जर पीक हाती नाही लागले तर हे कर्ज कसे फेडायचे अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे, दरम्यान याच चिंतेतून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Washim News)

Boer Goat Farm । नोकरीला व्यवसायाची जोड! प्राध्यापकाचं जबरदस्त नियोजन, ‘या’ जातीच्या शेळीपालनातून लाखोंची कमाई

वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याने कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. संदीप राठोड असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! आजपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी

शेतामध्ये काहीही पिकत नाही त्याचबरोबर कर्जाचा डोंगर देखील दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे आणि आपला संसार कसा चालवावा या चिंतेत संदीप राठोड कायम होते. आणि याच चिंतेतून त्यांनी शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Government Scheme । मस्तच! अवघ्या १ हजारात मिटेल शेतीचा वाद, सरकारची ‘ही’ योजना येईल कामी

संदीप राठोड यांनी आपल्या आई वडिलांच्या नावावर 45 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून हे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र त्यांच्यासाठी ते कर्ज फेडणे फारच कठीण होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवली.

Mahogany Farming । महोगनीच्या एका झाडापासून तुम्ही कमावू शकताय लाखो रुपये; जाणून घ्या कशी करायची लागवड?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *