Warehouse In Village : शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागल्याने साहजिकच त्यांच्यावर आर्थिक संकट येते, अनेक शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ येते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकार विविध योजनांना (Government schemes) सुरुवात करत असते. ज्याचा या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो.
Farmers Interest Waive : मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
गाव तिथे गोदाम
अनेकवेळा शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल खराब होतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. पण आता शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होणार नाही. कारण सरकारने (Government) प्रत्येक गावात गोदाम उभारण्याचा निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून योजना सुरु करण्यात आली आहे. गाव तिथे गोदाम असे या योजनेचे (Warehouse in the village) नाव आहे. या सरकारी योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल या गोदामात साठवता येईल. (Schemes for farmer)
सरकारने काढला जीआर
यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे दर कमी असताना त्यांचे धान्य या गोदामात ठेवता येईल आणि चांगला बाजारभाव मिळेल तेव्हा त्याची विक्रीदेखील करता येईल. सरकारने प्रारुपासाठी समिती स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान याबाबतचा जीआर देखील सरकारकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत फुलवली खरबुज शेती, आज होतेय लाखात कमाई
यंदा शेतमालाचे दर घसरले आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. काही शेतकरी घरात शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने हा शेतमाल विक्रीला नेतात आणि समजा शेतमालाचे दर कमी असतील तर कमी किमतीत देखील शेतमालाची विक्री करतात, शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता आता सरकारने गावागावात गोदाम उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?