Voter ID Card

Voter ID Card । मस्तच! आता मोबाईलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड

तंत्रज्ञान

Voter ID Card । १८ वर्ष वय पूर्ण होणाऱ्या सर्वच भारतीय नागरिकांकडे मतदान कार्ड असते. याच्या मदतीने तुम्हाला मतदान करता येते. तसेच ओळखपत्र म्हणूनही मतदान कार्डचा वापर करतात. शिवाय अनेक कामांसाठी मतदान कार्डचा वापर करतात. जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

या निवडणुकीत तुम्हाला मतदान कार्डशिवाय मतदान करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांकडे मतदान कार्ड नाही. जर तुमच्याकडेही मतदान कार्ड नसेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही घरीबसल्या मतदान कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे वोटर हेल्पलाइन ऍप असावे.

LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ

ज्या लोकांनी अजूनही मतदान कार्डसाठी नोंदणी केली नाही त्या सर्व लोकांना भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत ऍपद्वारे मतदान कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. जाणून घेऊयात मतदान कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

Onion Rate । कांद्याचे दर वाढले? जाणून घ्या बाजारातील परिस्थिती

फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात अगोदर Voter Helpline ऍप इन्स्टॉल करा.
  • ऍप उघडल्यानंतर तुमच्या समोर Disclaimer ची माहिती दिसेल. Agree वर क्लिक करून Next बटन वर क्लिक करा.
  • ऍपची भाषा निवडा.
  • नवीन पेज वर Voter Registration बटन वर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर विविध फॉर्मची लिस्ट दिसेल त्यातील New Voter Registration (Form 6) वर क्लिक करावे.
    पुढे Let’s Start बटन वर क्लिक करा.
  • नवीन पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP या बटन वर क्लिक करा. ओटीपी टाकून Verify OTP या बटनवर क्लिक करा.
    Yes, I am applying for the first time आणि No, I already have voter ID असे तुमच्यासमोर पर्याय दिसतील.
  • त्यापैकी पहिला ऑप्शन सिलेक्ट करून Next बटन क्लिक करा.
  • पुढे तुमचे राज्य, जिल्हा, आणि विधानसभा मतदारसंघ निवडून आधार कार्ड नंबर टाका.
  • आता तुमची जन्मतारीख, पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्म दाखला इत्यादी अपलोड करा.
  • तुमची कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला Preview सेकशन दिसेल त्यांनंतर Next बटन वर क्लिक करा.
  • नवीन पेजवर तुम्हाला तुमचा 200 KB पेक्षा जास्त साइज नसणारा फोटो अपलोड करावा लागणार आहे. नंतर तुमच्याविषयी माहिती भरावी लागणार आहे.
    आता मोबाइल नंबर, ई-मेल टाकून तुम्हाला कोणते अपंगत्व असल्यास ते निवडून Next बटन वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीची माहिती द्यावेळी लागेल ज्या व्यक्तीकडे अगोदरपासून मतदान कार्ड आहे. Relation Type मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचा तुमच्याशी असणारा संबंध निवडा.
  • खाली त्या व्यक्तीचा EPIC नंबर टाकून त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती भरा
  • तुमचा पूर्ण पत्ता, Select Address Proof मध्ये आधार कार्ड निवडून आधार कार्ड अपलोड करा.
  • Declaration मध्य तुम्ही राज्य, जिल्हा, आणि गाव निवडा. आधी दिलेल्या पत्यावर तुम्ही कधीपासून राहता ते निवडून नंतर तुमचे नाव टाका आणि सध्याचे ठिकाण टाकून Done बटनावर क्लिक करा.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक Reference ID देण्यात येईल. तो Save करून ठेवा. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागेल.
  • होम पेज वर जाऊन तुम्ही मतदान कार्डचा स्टेटस पाहू शकता, त्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या Explore बटन वर क्लिक करून Status Of Application ऑपशन वर क्लिक करा.
  • तुमचा Reference ID टाकून तुम्ही तुमच्या मतदान कार्डचा स्टेटस पाहू शकता.
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारण १५ ते ३० दिवसामध्ये कागदपत्रे तपासणी होऊन मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज मोबाइल वर येतो. तसेच ऑफलाईन कार्ड साधारण ३ ते ६ महिन्यात तुमच्या पत्यावर पोस्टाने येते.

Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *