Vegetable rates

Vegetable rate । ट्रक चालकांच्या संपाचा मोठा परिणाम, भाज्यांचे दर एका रात्रीत झाले दुप्पट

बातम्या

Vegetable rates । यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदर पावसाने दिलेली हुलकावणी आणि नंतर अवकाळी पावसाने (Heavy Rain) शेती धोक्यात आली. आर्थिक संकट आल्याने शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे. शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. दरम्यान, केंद्रीय पथकाने (Central team) देखील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे.

Agricultural Loans । मोठी बातमी! कृषी कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका रात्रीत भाज्यांचे दर दुपटीने वाढले (Vegetable rate hike) आहेत. नाशिक, नागपूरसह राज्यातील अनेक भागात ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. मागणी जास्त आणि आवक कमी झाल्याने हा परिणाम दिसत आहे. (Vegetable Price) यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Desi jugad । शेतकऱ्यांच्या जुगाडापुढे इंजिनिअरही फेल, नदी पार करण्यासाठी बनवली बोट

दर वाढण्याचं नेमकं कारण

दरम्यान, केंद्र सरकारकडून हिट ॲन्ड रन केस (Hit and run case) प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्याच्या विरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन (Truck drivers strike) सुरु केले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या विरोधात आहे, असं वाहन चालकांचे मत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर एका रात्रीत गगनाला भिडले आहेत.

Hydroponics feed । शेतकरी मित्रांनो! तंत्रज्ञानाच्या मदतीने काही क्षणात बनवा हिरवा चारा

एपीएमसी भाजीपाला मार्केटवर ट्रक चालकांच्या संपाचा झालेला पहायला मिळतोय. एपीएमसी बाजारात परराज्यातील माल आला नाही. त्यामुळे राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाली आहे. भाजीपाल्याची आवक 50 टक्क्यांनी घसरली आहे. ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Compost Fertilizer । सोप्या पद्धतीने करा घरच्या घरी कंपोस्ट खत, कसं ते जाणून घ्या

पेट्रोल पंपावर गर्दी

इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारल्याची बातमी समजतात राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर दूरच दूर रांगा लागल्या होत्या. पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे सकाळपासूनच पेट्रोल पंपावर ‘नो स्टॉक’चे बोर्ड देखील लागले आहेत.

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांवर अन्याय, पीक कर्जाची नियमीत परतफेड करूनही मिळाले नाही अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *