Vegetable farming । भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे डॉक्टरदेखील हिरव्या पालेभाज्या (Vegetable) खाण्याचा सल्ला देतात. यामुळे आरोग्य चांगले राहते, कोणताच आजार आपल्याला होत नाही. राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. जर तुम्हाला या दिवसात भरघोस नफा मिळवायचा असेल तर आजच काही हिरव्या भाज्यांची लागवड करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल.
Land Rule । काय सांगता! शेतीचा बांध कोरला तर कारवाई होते? महत्त्वाचा नियम एकदा वाचाच
करा या भाज्यांची लागवड
तुम्ही वांगी, टोमॅटो आणि मुळा यांची लागवड (Vegetable cultivation) करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही या भाज्यांची लागवड केली तर तुम्हाला दोन महिन्यांचा बंपर परतावा मिळेल. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात हंगामी हिरव्या भाज्यांची लागवड केली तर तुम्हाला जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये बंपर उत्पादन मिळेल. शिवाय तुम्हाला जास्त आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे आजच या भाज्यांची लागवड करा.
Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी
परंतु तुम्हाला भाज्यांची लागवड केल्यानंतर तुम्हाला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्यांचे चांगले उत्पादन होते. विशेष म्हणजे पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांची चव एक वेगळी असते. सध्या हिरव्या भाज्यांचे खूप प्रकार बाजारात आले आहे, जे पेरणी झाल्यानंतर भाजीपाल्याच्या झाडांना वेळेपूर्वीच फुले आणि फळे येतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुळ्याचे पीक अवघ्या 40 ते 50 दिवसांत तयार होते. हिवाळ्यात मुळ्याला चांगली मागणी असते. त्यामुळे जर तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर आजच या मागणी असणाऱ्या पिकाची लागवड करा. चांगले पिक येण्यासाठी तुम्हाला योग्य वेळी पाणी द्यावे लागणार आहे, हे लक्षात ठेवा.
Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…