Unseasonal Rain

Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान

बातम्या

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

यंदा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. काही महिन्यांपूर्वी कांद्याचे दर (Onion Rate) कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ झाली. परंतु सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याचे दर घसरले (Onion Rate Falls Down) आहेत. अशातच आता अवकाळी पावसाच्या हजेरीने कांद्याचे नुकसान झाले आहे, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दीड ते दोन तास जोरदार बॅटिंग केली.

Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध

कोट्यवधी कांद्याचे नुकसान

त्यामुळे लासलगावसह परिसरातील विंचूर, कोटमगाव, थेटाळे, धरणगाव, रुई, वनसगाव, वेळापूर, पाचोरे बुद्रुक व खुर्द, मरळगोई खुर्द व बुद्रकसह इतर ठिकाणचे कांद्याचे नुकसान (Nashik Unseasonal Rain) झाले आहे. या पावसात लेट खरीप लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याची रोपे उध्वस्त झाली आहेत. यामध्ये अंदाजे पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अस्मानी-सुलतानी संकटाने कांदा उत्पादकांचे (Onion Crop) नुकसान झाले आहे.

Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन

कांदा उत्पादक संकटात

मागील हंगामात पाऊस उशिरा झाल्याने लेट खरीप लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याची उशिरा लागवड झाली. येत्या काळात कांद्याची रोपे जास्त किमतीत खरेदी करावी लागणार आहेत. इतकेच नाही तर विंचूर रोडवरील साई बाबा ट्रेडर्सची कांद्याची चाळ जमीनदोस्त झाली आहे. या चाळीमध्ये साठवलेला ४०० ते ५०० क्विंटलच्या जवळपास २० ते २५ लाखांचा कांदा भिजला आहे.

Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार

दरम्यान, काढणीवर आलेल्या दहा हजार ४०८ हेक्टरवरील नवीन लाल कांद्याचे पावसाने खूप नुकसान झाले आहे. ४६७ हेक्टरवरील कांदा रोपे पाण्यात गेली आहेत. त्यामुळे उन्हाळ कांद्याची लागवड अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिरायत क्षेत्रातील ४८८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *