Ujani Dam

Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी

बातम्या

Ujani Dam । यंदा पावसाने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. (Rain in Maharashtra) पावसाअभावी पिके जळाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी उजनी धरणातून पाणी सोडण्याची विनंती करत होते. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Milk Subsidy । दूध उत्पादकांना मोठा धक्का! दुधात पुन्हा ५ ते ६ रुपयांची घसरण

असणार शेवटचे आवर्तन

सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी काल रात्रीपासून डाव्या कालव्यातून 500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या उजनी धरणात 5.34 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा (Ujani Dam Reservoir) शिल्लक असून या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना हे पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Onion Powder Project in Nashik । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिकमध्ये कांदा भुकटी प्रकल्प सुरू होणार

दरम्यान, सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सुरू असताना आता शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 11 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली. त्यादरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

Havaman Andaj । मोठी बातमी! २ दिवस पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून मदत मिळणार? वाचा बातमी

शेतकऱ्यांना मोठा आधार

शिवाय जिल्ह्यातील एक लाख 53 हजार हेक्टर जमिनीला उजनी धरणातील पाण्याचा खूप मोठा आधार आहे. या धरणातील पाण्यावर जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमधूनही जवळपास दहा हजार हेक्टरवरील जमिनीला पाणी मिळते. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी उजनीतील पाणीसाठ्यावर विशेष लक्ष असते.

Agriculture News । ‘हा’ AI चॅटबॉट शेतकऱ्यांचा सोबती, प्रत्येक प्रश्नाचे एका झटक्यात मिळणार उत्तर

यावर्षी सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. इतकेच नाही तर पावसाळा संपला त्यावेळी उजनीत 66 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे, यात कसलीच शंका नाही. सोलापूर शहरासाठी पाणी सोडल्यानंतर उजनीची पाणीपातळी घटणार आहे. पाण्याची लेव्हल कमी झाल्यानंतर कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यास समस्या निर्माण होते.

Satbara Utara । सोप्या पद्धतीने मोबाईलवरून काढा 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे, कसे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *