Ujani Dam । राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. शिवाय सध्या पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. परंतु, कमी पावसामुळे या धरणातदेखील अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नाही. उजनी धरणातील (Ujani Dam News) पाणीपातळी ६०. ६६ टक्के झाली आहे.
Animal Insurance । अवघ्या तीन रुपयांत मिळणार पशुविमा, लवकरच येणार मंत्रिमंडळात प्रस्ताव
शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतीसाठी किती आवर्तने मिळणार, हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मागच्या दहा ते बारा दिवसांपासून उजनीच्या पणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या आहेत.
Sonalika Tractor । शक्तिशाली इंजिनसह सोनालिकाने लॉन्च केले पाच ट्रॅक्टर, पहा लिस्ट
“याच धरणातून जिल्ह्यात सिंचन आणि सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात येते. यावर्षी उजनी धरणातील पाणी पातळी ६०.६६ टक्के इतकी आहे. त्यामुळे पाण्याबाबत सर्वांच्या गरजा लक्षात घेता अचूक नियोजन करावे. धरण परिसरातील अनधिकृत पाण्याचा उपसा होणार नाही याबाबत जलसंपदा विभागाने दक्षता घ्यावी,” अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
Lucky Cow । काय सांगता? एका गायीने बदलले कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या