Tur Rate

Tur Rate । तूरीला सध्या किती भाव मिळतोय? उत्पादनात मोठी घट, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?

बाजारभाव

Tur Rate । तुरीच्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. त्याचबरोबर याला मेहनत देखील इतर पिकांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे अनेक शेतकरी तूर लागवड करतात शेतकऱ्यांना तुरीमधून चांगला नफा देखील मिळतो. मात्र यंदाच्या वर्षी तुरीच्या उत्पादनात घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले आहे. त्यामुळे तूर ११ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काही पडलेलं नाही. (Tur Rate Today)

Benefits of using alum in agriculture । शेतीत तुरटी वापरण्याचे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुरीचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी उपलब्ध झाली नाही. तुरीच्या बाजारभावाबद्दल आपण पाहिले तर हिंगोली बाजार समितीच्या मेंड्यात तुरीला चांगला भाव मिळत आहे. पहिल्यांदा तुरीला सरासरी ८ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला त्यानंतर तुरीच्या भावामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. नंतर तुरीचे भाव १२ हजार रुपयांवर गेले आणि आता सध्या स्थितीत तुरीचे भाव ११ हजार रुपयांवर आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या तुरीचे किडीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! या राज्यांमध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती

पुढच्या एक-दीड महिन्यात शेतकऱ्यांकडे नवीन तुर विकण्यासाठी येईल. मात्र यंदा देखील पावसाचा फटका बसला असून तुरीची वाढ झालेली नाही. पावसाच्या उघडीपीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची तूर वाळून गेली आहे. त्याचबरोबर शेतात असणाऱ्या तुरीवर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. नव्या तुरीला समाधानकारक भाव मिळेल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

Onion Price । कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! महिन्यातच दरात मोठी घसरण

तुरीला मिळतोय ११ हजार रुपयांचा भाव

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंड्यात तुरीला सध्या११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गत महिन्यात तुरीला अकरा हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला होता मात्र. सध्या या भावात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आगामी काळात तुरीचे भाव वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Red Chilli । लाल मिरचीची आवक वाढली! प्रतिक्विंटल मिळतोय तीन हजार ते साडेसहा हजारांचा दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *