Tur Market

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

बाजारभाव

Tur Market । कांदा, ऊस, मका यांसारख्या पिकांप्रमाणे राज्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचे (Tur) उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी तुरीला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड (Tur cultivation) करतात. दरम्यान, यंदाही तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. मागील काही दिवसांपासून तुरीचे दर (Tur rate) वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

किती आहेत दर?

यावर्षी बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीचादेखील तूर (Tur rate hike) बाजाराला चांगला आधार मिळत आहे. याच कारणामुळे तुरीचे भाव सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. तुरीच्या भावातील तेजी येत्या काळातही कायम राहू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा तूर उत्पादकांना चांगला फायदा होईल.

E-Crop Registration । आता एकाच ॲपद्वारे ई-पीक नोंदणी सातबारावर होणार; जाणून घ्या

उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट

दरम्यान, यंदा तुरीच्या उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत घट येईल अशी भीती काही तज्ञ व्यक्त करत आहे. खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे तुरीवर विविध किटकामुळे आणि रोगांमुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. सध्या तुरीची काढणी सुरु आहे. शेतकरी काढणी झाल्यांनतर बाजारात विक्री करत आहेत.

Hydroponics Technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

त्याशिवाय शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई पाहायला मिळाली होती. आठवड्याचा शेवट भाव कमी होण्यासह झाला असून सोयाबीन निचांकी १२.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते आणि सोयपेंड ३५६ डाॅलरवर पोचले. देशातील बाजारात आवकेचा दबाव कायम आहेत. तसेच त्याचे दरही जैसे थे, असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

या दरात केवळ २० ते ५० रुपयांच्या दरम्यान चढ उतार होत आहेत. दरपातळी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बााजरातील अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *