Tur Market

Tur Market । तुरीला सध्या किती बाजारभाव मिळतोय? शेतकरी मित्रांनो वाचा एका क्लिकवर

बाजारभाव

Tur Market । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे (Tur) खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता होती. अशातच आता नवीन हंगामात तुरीला चांगला भाव मिळत होते. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. (Tur cultivation) पण शेतकऱ्यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे.

Dhananjay Munde । शेतकऱ्यांच्या खात्यात येणार तब्बल 23 कोटी 37 लाख रुपये, धनंजय मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

तुरीचे दर ६ हजारांवर

आज बाजारात लोकल, लाल,पांढरा, गज्जर, हायब्रीड, काळी या तुरीची आवक झाली होती आणि लातूर, अकोला, कारंजा, बाभूळगाव, आर्वी, मुर्तिजापूर, मलकापूर, जालना, चांदूर बाजार आणि मेहकर या बाजार समित्यांमध्ये १ हजारांपेक्षा जास्त तुरीची आवक झाली. दरम्यान, कारंजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सगळ्यात जास्त म्हणजे २ हजार ८०० क्विंटल तुरीची आवक झाली होती. (Tur rate)

Success Story । काय सांगता! लसणाच्या शेतीतून शेतकरी बनला करोडपती, कसं केलं नियोजन

या ठिकाणी ९ हजार ५०० रूपये सरासरी दर (Tur rate today) मिळाला. आजच्या दिवसातील सगळ्यात कमी सरासरी दर हा अंबड – वडीगोद्री बाजार समितीमध्ये मिळाला आहे. येथे तुरीला ५ हजार ९०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये २१० क्विंटल तुरीची आवक झाली असून औराद शहाजानी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच १० हजार १९३ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

शेतकऱ्यांना मोठा धक्का

दरम्यान, तुरीला आज किमान दर हे ५ हजार १०० ते ६ हजार रूपये प्रतिक्विंटल इतके मिळाले आहेत. तर अनेक ठिकाणी किमान दराचा पारा घसरल्याचं चित्र आहे. सध्या तुरीची काढणी सुरु आहे. शेतकरी काढणी झाल्यांनतर बाजारात विक्री करत आहेत. यावर्षी पावसामुळे देशातील सर्वच उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यातील सर्वच बाजार समितीत तुरीला चांगली मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Milk Rate । दुध अनुदानाची संपली मुदत, आता होणार दुधात दरवाढ?

यावर्षी तुरीला चांगली मागणी आहे. तर १० हजारांपेक्षा जास्त दर अनेक ठिकाणच्या तुरीला मिळत आहे. सध्या कमीत कमी सरासरी दर हा ८ हजारांपेक्षा जास्त असला तर बहुतांश बाजार समित्यांमध्ये ९ हजार ते १० हजारांच्यामध्ये दर आहे, असे दिसून येत आहे. तसेच बाजारातील आवकही तुलनेने खूप कमी झाली आहे.

Dairy Farming । आता म्हैसच सांगणार मी आजारी आहे, उद्या कमी दूध देईल; लवकरच येणार सेन्सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *