Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे (Tur) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी तुरीला चांगला भाव (Tur rate) मिळत होता. येत्या काही दिवसात आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. पण सध्या भावावर दबाव आहे.
Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?
तुरीच्या भावावर दबाव
सध्या कर्नाटकातील बाजारामध्ये (Tur Market) तुरीची आवक झपाट्याने वाढली आहे. याच कारणामुळे तुरीच्या दर दबाव असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता संक्रांतीनंतर देशातील इतरही बाजारात तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता हे भाव वाढतील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर तुरीचे भाव (Tur rate in market) वाढले तर याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण
तुरीच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची नरमाई पाहायला मिळत आहे. तुरीचे भाव सध्या ८ हजार ३०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. हे लक्षात घ्या की तुरीला यंदा घटलेले उत्पादन, स्टाॅकीस्टची खरेदी आणि सरकारची बाजारभावाने खेरदीचा आधार असल्याने तुरीच्या भावात पुन्हा सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Grape rates । धक्कदायक! करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ३०० कोटींचे नुकसान
उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट
दरम्यान, यंदा तुरीच्या उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत घट येईल अशी भीती काही तज्ञ व्यक्त करत आहे. (Tur Market) खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे तुरीवर विविध किटकामुळे आणि रोगांमुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. सध्या तुरीची काढणी सुरु आहे. शेतकरी काढणी झाल्यांनतर बाजारात विक्री करत आहेत.
त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन आजही १२.२६ डाॅलर प्रतिबुशेल्स आणि सोयापेंड आजही ३६२ डाॅलरवर होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन भावावर पुरठ्याच्या अंदाजामुळे दबाव असून देशातील सोयाबीनचे भाव आज ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर आहेत.
Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप