Tur Market Price

Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या

बाजारभाव

Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे (Tur) खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता नवीन हंगामात तुरीला चांगला भाव (Tur price hike) मिळत आहे. येत्या काही दिवसात आवक कमी (Tur price) झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Alu Cultivation । शेतकरी मित्रांनो अळूची लागवड करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत; जाणून घ्या लागवडीबद्दल कृषी तज्ञांची मोठी माहिती

उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट

दरम्यान, यंदा तुरीच्या उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत घट येईल अशी भीती काही तज्ञ व्यक्त करत आहे. (Tur Market) खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे तुरीवर विविध किटकामुळे आणि रोगांमुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. सध्या तुरीची काढणी सुरु आहे. शेतकरी काढणी झाल्यांनतर बाजारात विक्री करत आहेत. (Tur rate)Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

पैशांची गरज असल्याने शेतकरी तातडीने तुरीची विक्री करत आहेत. अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तुरीची आवक वाढत आहे. तरीही बाजारभाव अजूनही दबावात आहेत. तुरीचे सरासरी दर 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी तुरीचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जात नमूद केले जात होते.

Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये

जाणून घ्या दर

काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात तुरीला किमान 6 हजार 820 रुपये प्रति क्विंटल, कमाल 9320 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 8 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून परदेशातून तुरीची आयात सुरू आहे. त्यामुळे सध्या देशांतर्गत तुरीची उपलब्धता अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.

Soybean rates । सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त, हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन केले आंदोलन

येत्या काही दिवसात बाजारात नवीन माल दाखल होण्याची शक्यता आहे. तुरीचा जुना माल कमी असून नवीन माल देखील पावसामुळे कमी असण्याची शक्यता आहे. यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहणार आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला होणार आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना तूर खरेदी करावी लागेल.

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *