Tur Import । शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना सतत करावा लागतो. नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीचे (Tur Crop) खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन हंगामात तुरीला चांगला भाव (Tur Rate) मिळू शकतो. आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. (Tur Market)
Soybean Rate । साेयाबीन उत्पादकांवर मोठं संकट! उत्पादन खर्चही निघणं अशक्य
मोझांबिकसोबत आयातीचे करार
अशातच मोझांबिकने स्वस्त भावात तूर (Mozambique Tur) देण्यास नकार दिल्यानंतर भारताकडून दबाव वाढवण्यात आला होता. मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोर्टाने भारताला चांगलाच झटका दिला असून यामुळे आफ्रिकेतील इतर देशांच्या तुरीच्या भावात कमालीची वाढ (Tur Price Hike) झाली आहे. भारताने मोझांबिकसोबत वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचे करार (Mozambique Import Agreement) केले आहेत.
Onion Rate । पाकिस्तानात कांद्याला किती मिळतोय दर? किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित
करारानुसार मोझांबिक भारताला दोन लाख टन तूर (Mozambique Tur Import Agreement) देणार आहे. भारताला तुरीचा तुटवडा जाणवत असल्याने तुरीच्या दरात वाढ झाली आहे. तुरीचे दर कमी करण्यासाठी मोझांबिकने सर्व तूर भारताला तातडीने निर्यात करावी, असा दबाव भारताकडून टाकला. दीड ते दोन लाख टन तुरीचा स्टॉक असून निर्यातदार तूर निर्यात (Tur Import Agreement) करत नाहीत, त्यांना भारताच्या अडचणीचा फायदा घेत जास्त दर वसूल करायचा आहे, असे भारतातील आयातदारांनी मोझांबिकशी केलेले करार रद्द करण्याची मागणी केली. (Tur Production)
भारताला मोठा धक्का
कोर्टाने सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनलाही स्थगिती दिल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. मोझांबिकमधून आयात थांबली असल्याने आफ्रिकेतील इतर देशांकडे तुरीची मागणी वाढली आहे. देशातील आयातदार मालावी, टांझानिया, युगांडा आणि केनिया या देशांकडे तुरीची चाचपणी करत असून या देशांच्या तुरीला ८ हजार ते ९ हजार रुपयांचा दर मिळत आहे.
दरम्यान, तुरीला देशातील बाजारात सध्या ९ हजार ते ११ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. बाजारात नवीन माल पुढील महिनाभरात दाखल होण्याची शक्यता आहे. तुरीचा जुना माल कमी असून नवीन माल कमी असण्याची शक्यता आहे. यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहणार आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला होणार आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना तूर खरेदी करावी लागेल.
Sugarcane Crop । करा ‘या’ पद्धतीने उसाची लागवड! एकरी मिळेल 80 ते 150 टन उत्पन्न