Trending News

Trending News । शेतकऱ्याची दोन लाखांची सोन्याची पोत हरवली, म्हशीवर घेतला संशय त्यानंतर केले ऑपरेशन; घटना वाचून तुम्हीही व्हाल थक्क

पशुसंवर्धन बातम्या

Trending News । सध्या वाशिम जिल्ह्यामधून चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या बायकोची अडीच तोळ्याची सोन्याची पोत चक्क म्हशीने गिळली या पोतची किंमत साधारणपणे दोन लाख रुपये इतकी आहे. काही समजायच्या आतच म्हशीने पोत फस्त केली. त्यानंतर म्हशीच्या पोटामधून ही पोत कशी काढायची? असा प्रश्न उपस्थित झाला. आता ही घटना नेमकी कशी घडली? म्हशीने पोत कशी गिळली? याबद्दल जाणून घेऊया माहिती. (Washim News)

Parbhani News । मोठी बातमी! परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान; उभी पिके गेली पाण्याखाली

सध्या खरीप हंगाम चालू असून शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन, तूर, उडीद ही पिके आहेत. बरेच शेतकरी शेतातुन खाण्यासाठी सोयाबीनच्या शेंगा घेऊन येतात तसेच. वाशिम जिल्ह्यातील सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर यांनी देखील शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या त्यानंतर त्यांच्या बायकोने सोयाबीन शेंगा सोलून त्याची टरफले ताटात काढली आणि रात्री झोपताना गळ्यातील दोन तोळे वजन असलेली सोन्याची पोत अनावधानाने त्याच ताटामध्ये राहिली.

Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज

आपल्याकडे सर्वांना सवय असते की जर काही खाद्यपदार्थ शिल्लक राहिले तर सकाळी गुरांना चारा म्हणून टाकायचे. तसेच या शेतकऱ्याच्या पत्नीने देखील शेंगांचे टरफले म्हशीला टाकले. या शेंगाच्या टरफल्यासोबत सोन्याची पोत देखील म्हशीच्या खाण्यात आली. त्यानंतर त्यांना लक्षात आले की आपली पोत कुठेतरी पडली. त्यानंतर त्या मोठ्या चिंतेत होत्या. त्यानंतर त्यांनी सर्व माहिती आपल्या पतीला सांगितली. यानंतर पोत कोणी चोरली का? कुठे हरवली? म्हशीने चाऱ्यासोबत खाल्ली तर नाही ना? अशा शंका त्यांना येऊ लागल्या.

Fish Farming । नादच खुळा! वयाच्या ५८ व्या वर्षी महिला मत्स्यपालनातून कमावते लाखो रुपये; जाणून घ्या कसं केलं जात नियोजन?

त्यानंतर त्यांनी आपल्या म्हशीला जवळच्या रुग्णालयात नेले आणि म्हशीची सोनोग्राफी केली त्यानंतर म्हशीच्या पोटात दोन तोळ्याची सोन्याची पोत असल्यासची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी म्हशीची शस्त्रक्रिया करून पोटातील दोन तोळ्याची सोन्याची पोत काढली आणि यानंतर भोयर परिवाराचा जीवात जीव आला. या सोन्याच्या पोथीची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये असल्याचे या शेतकरी कुटुंबाने सांगितले. म्हशीची ऑपरेशन नंतर तब्येत व्यवस्थित असून ती चारा खात आहे मात्र जनावरांना चारा टाकताना काळजी घेण्याचे आवाहन यावेळी डॉक्टरांनी केले आहे.

Soybean Rate । सोयाबीनची बाजारात आज कशी स्थिती आहे? जाणून घ्या आजचे बाजारभाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *