Tree Plantation Scheme

Tree Plantation Scheme । धक्कादायक! अनुदान अपहारप्रकरणी न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

शासकीय योजना

Tree Plantation Scheme । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असतो. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असतो. दरम्यान, शेतकरी अवकाळी पाऊस तर कधी शेतमालाला बाजारभाव नसल्याने हतबल होत असतात. सरकार शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता अनेक योजना (Govt Scheme) सुरु करत असते. ज्याचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेत आहेत.

Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?

पण काही लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा (Agri Scheme) लाभ घेता येत नाही. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारच्या (State Govt) ३३ कोटी वृक्ष लागवड या योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी मंगळवेढा न्यायालयात दाखल केली होती. (Tree Plantation Subsidy)

Bullock Cart Race । बैलगाडाप्रेमींसाठी मोठी बातमी! गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

यावरून आता मंगळवेढा न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की राज्य सरकारने राज्यात तब्बल ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. यानुसार सामाजिक वनीकरण विभागाने २०१७ ते २०२३ दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याचे दाखविले आहे.

Government Schemes । सरकारी अनुदानासह खरेदी करा जमीन, ‘या’ लोकांना मिळतोय लाभ

पण ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाली आहे, अशी तक्रार दादासाहेब चव्हाण यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन बोगस मजूर दाखवून १४ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार न्यायालयात दाखल केली. आता याप्रकरणी न्यायालयाने निकाल देत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Foreign tour of farmers । मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला दीड कोटींचा निधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *