Tomato Rate | मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगलीच उच्चांकी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले होते. अशातच शेतकऱ्यांनी लाखो ते करोडो रुपये देखील टोमॅटो मधून कमावले होते. मात्र आता टोमॅटोचे दर पुन्हा एकदा घसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलोवर पोहोचले होते मात्र आता हा दर आठ ते दहा रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
टोमॅटोचे भाव अचानक घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आगामी काळात शेतकऱ्यांचे नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणार आहेत. मात्र त्या आधीच टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोचे भाव वाढले होते त्यामुळे आगामी काळात देखील असेच भाव वाढून राहतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली होती. मात्र सध्या टोमॅटोचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.
मागच्या एक महिन्यापासून पावसाने चांगली विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतातील पिकांनी आता माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामध्ये आता टोमॅटोचे तसेच इतर भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडल्याचे पाहायला मिळत आहे.
दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी
सध्या काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.