Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

बाजारभाव

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोचे दर खूपच कमी झाले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गत महिन्यात टोमॅटोच्या एका क्रेटला १०० ते १५० रुपये दर होता. मात्र आता प्रतिक्रेट ३००ते ५०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Tomato Rate)

Cultivation Of Ginger । एक हेक्टर जमिनीत 25 लाख रुपयांपर्यंत कमाई करा, बंपर नफ्यासाठी आल्याची लागवड सुरू करा

टोमॅटोला भाव मिळतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. यानंतर शेतकऱ्यांचे टोमॅटो बाजारात देखील आले मात्र बाजारात जास्त आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला योग्य तो भाव मिळत होता. टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होते. मात्र सध्या टोमॅटोच्या दरात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे/ त्यामुळे लवकरच टोमॅटोचे दर चांगले वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

Electric tractor । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतातील कामे होणार कमी खर्चात 3 नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच

मागच्या महिन्यात टोमॅटो तोडण्यास महाग झाल्याने सर्वत्र शिवारात लाल चिखल पाहायला मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे लक्ष दिले नाही. मात्र चालू महिन्यात आता टोमॅटोच्या उत्पादनात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे याचा अवकेवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच टोमॅटोच्या दरात सुधारणा दिसून आले आहे.

Electric tractor । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतातील कामे होणार कमी खर्चात 3 नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच

नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक जवळपास ३ लाख क्रेटवर गेली होती. मात्र आता टोमॅटोच्या आवकेत चांगलीच घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ही आवक दीड लाखांवर होती. तर आता ही आवक 60 हजार क्रेट पेक्षा कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात टोमॅटोचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Agriculture News । महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती! कांद्याच्या पेरणीत मोठी घट होण्याची भीती, दुकानदारांनी कंपनीला 50 टक्के बियाणे परत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *