Tomato Pest

Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

कृषी सल्ला बातम्या

Tomato Pest । टोमॅटो हे असे पीक आहे ज्याला बाजारभाव मिळो न मिळो त्याची लागवड प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोच्या विक्रीतून करोडपती झाला आहे. कारण पावसामुळे यावर्षी टोमॅटोच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला. (Tomato Pest)

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर पुन्हा कोसळले आहेत. बाजारभावाविना टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशातच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट आले आहे. फळे पोखरणाऱ्या अळीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या अळीचा जास्त प्रादुर्भाव झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. या अळीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तुम्ही यावर सोप्या उपाय करू शकता.

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

जीवनक्रम आणि नुकसान

पतंग फिकट पिवळसर रंगाचा असून प्रौढ मादी कळ्या, पानाच्या देठावर, आणि फुलांवर एकेक अशी तब्बल ३०० ते ५०० अंडी देते. त्याचा आकार गोल असून ती दिवसायला हिरवट पिवळी असतात. एका आठवड्यानंतर या अंड्यातून अळी बाहेर येते. अळीच्या वाढीस १४ ते १५ दिवसाचा कालावधी गरजेचा असतो. अळीच्या शरीरावर तुटक अशा गर्द करड्या रेषा पाहायला मिळतात.

Desi Jugad । शेतकरी बापाने मुलासाठी केले भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

तिची लांबी ३० ते ५० मिमी इतकी असते. विशेष म्हणजे ही अळी जमिनीत झाडाच्या अवती भोवती वेष्टणात कोष अवस्थेत असते. ही अवस्था एक आठवड्यापासून ते महिनाभर असण्याची शक्यता असते आणि एक पिढी २५ ते ५२ दिवसांत पूर्ण होते. ही अळी सुरुवातीला कोवळी पाने खाऊन वाढणाऱ्या फांद्या कुरतडते. फळे लागल्यानंतर ही अळी फळांना छिद्र पाडून आतील भाग खाते. एक अळी २ ते ८ फळांचे नुकसान करते.

Havaman Andaj । गणपतीच्या स्वागतासाठी पावसाची दमदार हजेरी; ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

असे ठेवा नियंत्रण

शेताची कोळपणी, निंदणी झाल्यांनतर शेत तण येऊ देऊ नका.
प्रादुर्भाव झालेली फळे नष्ट करून मोठ्या अळ्या देखील नष्ट कराव्यात.
शेतात पक्षांना बसण्याची व्यवस्था करावी.
कामगंध सापळे लावा.
तसेच पिकांच्या लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनंतर शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस हे मित्रकीटक १.५ लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा सोडणे खूप महत्त्वाचे आहे. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात
महत्त्वाचे म्हणजे घाटे अळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही. (५०० एलई.) या कीटकनाशकाची प्रति हेक्टरी फवारणी ५०० मिलि प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून करा. महत्त्वाचे म्हणजे त्यात ५०० मिलि. चिकट द्रव आणि नीळ २०० ग्रॅम मिसळा.
त्याशिवाय पाच टक्के निंबोळी अर्का किंवा कडुनिंब आधारित अझाडेरेक्टिन( तीन हजार पीपीएम)2 मिली प्रति लिटर फवारणी करा.
बीटी जिवाणूजन्य कीटकनाशकदोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करा.
टोमॅटो पिकाची पुनर्लागवड करत असताना मुख्य पिकाच्या कडेला झेंडू, मका आणि चवळी लावा.

Maharastra Rain । ‘या’ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय भयंकर; जास्त किमतीने खरेदी करावा लागतोय हिरवा चारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *