Tar Kumpan Yojana Maharashtra 2023

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 । शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार देतयं 90% अनुदान; असा करा अर्ज

शासकीय योजना

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 । शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी दुष्काळ तर कधी जंगली जनावर शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. शेतकरी दिवस रात्र शेतीत काबाडकष्ट करतो आणि शेतीमध्ये आपलं पीक फुलवतो मात्र अनेक ठिकाणी जंगली प्राण्यांकडून शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन सरकार 2018 यावर्षीपासून महाराष्ट्रात काटेरी कुंपण करण्यासाठी 90% अनुदान देत आहे. आता सरकारच्या या अनुदानाचा कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात? यासाठी अर्ज कसा करायचा? याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Havaman Andaj । नागरिकांना सावधानतेचा इशारा! पुढील तीन दिवस ‘या’ जिल्यात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

महाराष्ट्र Tar Kumpan Yojana 2023 ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कुंपण करून त्यांच्या शेताचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करता यावे याकरिता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेती पिकांचे नुकसान टाळण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीला कुंपण करू शकतात जेणेकरून प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना टाळता येईल. (Tar Kumpan Yojana Maharashtra 2023)

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

या योजनेचा नेमका उद्देश काय?

शेतकऱ्यांना बऱ्याच नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये जर जंगली जनावरांनी पिकाची नासाडी सुरू केली तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे या योजनेचा उद्देश हा तार कुंपणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जनावर जाऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान टाळता येईल असा या योजनेचा उद्देश आहे.

Abdul Sattar । मोठी बातमी! कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कडक कारवाई; अब्दुल सत्तार यांचे आदेश

या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाची सुविधा ही ऑनलाईन पद्धतीने केली आहे. त्यामुळे तुम्ही या तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. या ठिकाणाहून तुम्ही तार कुंपण योजनेसाठी अर्ज करू शकता. मात्र बऱ्याचदा ऑनलाइन अर्ज सुरू झालेले नसतात. त्यामुळे या योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला हा अर्ज करता येईल यामधून देखील तुम्ही याचा लाभ मिळवू शकता.

Desi Jugad । शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड! पीक नष्ट करणाऱ्या भटक्या जनावरांसाठी शोधला उपाय; व्हिडीओ एकदा बघाच

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जर त्या कागदपत्रांची पूर्तता केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते खालील प्रमाणे पाहुयात

१) तुम्हाला ज्या जमिनीवर कुंपण करायचे आहे त्या जमिनीचा सातबारा उतारा
२) कास्ट सर्टिफिकेट
३) आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे देणे आवश्यक आहे.

Battery Operated Spray Gun । ‘या’ बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे गनच्या सहाय्याने शेतातील फवारणी होणार झटपट; जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *