Sugarcane Transport Vehicles । दररोज रस्ते अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. वाहतुकीचे नियम कडक करूनही लोक सर्रास वाहतुकीचे नियम (Transport Vehicles) मोडतात. बहुतांश अपघात वाहतुकीचे नियम (Transport Vehicles Rules) मोडल्याने होत आहेत. सध्या राज्यातील कारखाने सुरु झाले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक सुरु झाली आहे.
Garlic Cultivation । लसूण लावताय? तर मग करा ‘या’ वाणाची लागवड, मिळेल भरघोस उत्पादन
साखर कारखाने सुरु झाल्याने रस्त्यावर वाहनाची गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षी अनेकजण उसाच्या वाहनांना (Sugarcane Transport) धडकून मृत्युमुखी पडतात. यावर खबरदारी म्हणून ऊस वाहतूकदारांना आता रेडिअम, रिफ्लेक्टर लावण्यास सांगतात. परंतु वाहनचालक याकडे लक्ष देत नाही. परंतु जर यंदा वाहनचालकांनी याकडे लक्ष दिले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Silk Market Rate । शेतकऱ्यांची चांदी! रेशीम कोशाला अच्छे दिन, क्विंटलला मिळाला ५० ते ५५ हजारांचा दर
रेडिअम, रिफ्लेक्टर बंधनकारक
अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढच्या आणि मागच्या बाजूला रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे. चालू कारखान्यांना जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ऊस वाहतूक करणारे ट्रक, बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रेलर व इतर सर्व वाहनांना लाल पांढरे रिफ्लेक्टर लावून घेण्याबाबत सांगितले जात आहे.
Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
इतकेच नाही तर सर्व वाहनांची कागदपत्रे अपडेट असतील याची खात्री देखील करून घेण्यास सांगितली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाहन चालक आणि मालकांना साखर कारखानदारांकडून सूचना देण्यास वाहतूक शाखेने सांगितले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऊस वाहतूक वाहन चालकांनी वाहनावर रिफ्लेक्टर, रेडिअम लावून घ्यावे.
Apple Cultivation । कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती? जाणून घ्या
१४ हजार ३३४ ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावले होते. जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, संबंधित पोलिस ठाणे यांनी कारखाना स्थळावर जाऊन वाहन चालक आणि मालक यांचे प्रबोधन केले होते. यावर्षी सर्व साखर कारखाने यांना सूचनापत्र दिले आहेत. रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहीम ११ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु केले आहेत, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.
Poultry Farm । भावाच्या जिद्दीला सलाम! पोल्ट्री व्यवसाय सुरु केला अन् कमवतोय लाखो रुपये