Sugarcane Rate । काही दिवसांपासून उसाच्या दरावरून (Sugarcane price) वातावरण चांगलेच तापले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत ऊस कारखान्यात जाऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी घेतला होता. गळीत हंगाम सुरु होऊनही ऊस कारखान्यात न गेल्याने मोठे संकट (Sugarcane factory) आले होते. लवकरच तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे.
Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट
काल कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी चक्काजाम आंदोलन केले होते. मागील वर्षांत गाळप झालेल्या उसाचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून यावर्षीच्या हंगामात वाढून दर मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कारण दिवसभर सुरु असणाऱ्या आंदोलनावर तोडगा निघाला आहे.
टनामागे मिळणार १०० रूपये जास्त
ज्या कारखान्यांनी मागील हंगामात ऊसाला प्रतिटन तीन हजारांच्या आत दर दिला आहे, त्यांनी १०० रुपये आणि ३ हजार रूपयांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागच्या हंगामातील ५० रुपये अतिरिक्त देण्यास जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी (Sugarcane factory rate) ग्रीन सिग्नल दिला आहे. चक्का जाम आंदोलनाच्या सुमारे ८ तासानंतर अखेर उसाच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.
मागील हंगामासाठी ऊसाला प्रति टन ४०० रूपये तसेच यंदा एकरकमी साडेतीन हजार रुपये उचल मिळावी अशी मागणी स्वाभिनामी शेतकरी संघटनेने केली होती. महत्त्वाचे म्हणजे उसाच्या प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी जिल्हा पातळीवर तीन बैठका झाल्या होत्या. शिवाय यासंदर्भात बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. परंतु त्यात तोडगा निघाला नाही.
Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश
त्यामुळे आंदोलन चांगलेच चिघळले होते. दरम्यान, याच संदर्भात काल राजू शेट्टी यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये चर्चा झाली असून या बैठकीत शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. अखेर उद्यापासून तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे. शिवाय सर्व साखर कारखान्यांनी याबाबत आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित