Sugarcane Labor Unions

Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ

बातम्या

Sugarcane Labor Unions । सध्या राज्यात उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऑक्टोबर आणि नोंव्हेबर महिन्यामध्ये ऊसतोड कामगार मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी शेतात येत असतात. यंदा मात्र ऊसतोड मजुरांची संख्या खूप कमी झाली आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांच्या मागण्या (Sugarcane Labor Strike) प्रलंबित आहेत. सरकारदेखील याकडे लक्ष देत नाहीत. याच पार्श्वभूमीवर उसतोड मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ

नुकतीच साखर महासंघ, सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलकांची बैठक पार पडली. पूर्वी उसतोडणीसाठी मजुरांना प्रतिटन २३८ रूपये मिळत होते. परंतु, आता त्यात वाढ केली आहे. ऊसतोड मजुरांना (Sugarcane workers) नवीन निर्णयानुसार या दराच्या ३४ टक्के रक्कम वाढीव मिळणार आहे. इतकेच नाही तर मुकदमांच्या कमिशनमध्ये १ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

Government schemes । खुशखबर! लहान शेतकऱ्यांनाही मिळेल तलाव खोदण्यासाठी अनुदान, असा करा अर्ज

मुकदमांचे कमिशन आता २० टक्के केले आहे. या निर्णयामुळे ऊसतोड मजूर, मुकादम आणि आंदोलकांना (Sugarcane workers strike) दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उसतोड कामगारांच्या तोडणी दरात वाढ आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, यासह अनेक मागण्यांसाठी उसतोड संघटना (Sugarcane organization) आणि कामगारांचे मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. यावर आता अखेर उपाय निघाला आहे.

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

शरद पवारांनी केली मध्यस्थी

आंदोलक आणि साखर महासंघाच्या या प्रश्नात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यस्थी केली होती. ही दरवाढ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल. त्यामुळे कामगारांना त्याचे वाढीव पैसे मिळणार आहे. हा करार या वर्षीची हंगाम आणि येणाऱ्या दोन गळीत हंगामासाठी असेल. मजुरांना यंदाच्या गळीत हंगामाचे सुरूवातीपासून वाढीव दराने पैसे मिळतील.

Eicher 188 Tractor । उत्तम मायलेज आयशर 188 ट्रॅक्टर 3 लाखांच्या रेंजमध्ये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

साखर संघाकडून मुकादमांकडे किंवा कामगारांकडे राहणारे पैसे पोलिसांच्या कचाट्यात न सापडता द्यावेत अशा सूचना केल्या आहेत. संघाने केलेल्या सूचना संघटनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे मजूर संघटनांच्या मागण्यांसाठी उद्यापासून आंदोलन करणार होत्या. परंतु, त्यापूर्वी या प्रश्नावर मार्ग निघाला आहे.

Mahanand Dairy । महानंद वाचवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, किसान सभेचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *