Sugarcane FRP

Sugarcane FRP | उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा! शेतकरी संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

बाजारभाव

Sugarcane FRP | राज्यातील बहुतेक कारखान्यांचे गळीत हंगाम लवकरच सुरू होतील. बऱ्याच कारखान्यांमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर बॉयलरचे अग्निप्रदीपन देखील करण्यात आले आहे. दरम्यान उसाला किती दर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या वर्षी कारखान्यांनी उसाला पाच हजार प्रतिटन दर द्यावा. तसेच मागच्या वर्षाची उर्वरीत एक हजार बाकी तातडीने द्यावी आणि बाकी पूर्ण करणाऱ्या कारखान्यांनाच गाळप करण्यासाठी परवाना द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा देखील संघटनांकडून देण्यात आला आहे. परंतु या मागण्यांकडे कारखानदारांच्या प्रतिनिधींनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. ऊसदराच्या बैठकीमध्ये कारखानदारांच्या प्रतिनिधींनी संघटनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचालकांशी चर्चा करून लेखी अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे.

Fertilizer prices । खुशखबर! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट

शेतकरी संघटनांकडून करण्यात आलेल्या मागण्या

1) दिवाळीपूर्वी मागील हंगामात गाळपास गेलेल्या उसास प्रतिटन एक हजार रुपये दर द्यावा.
2) आताच्या हंगामामध्ये प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा.
3) दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकावी.
4) आंदोलनातील शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत

Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *