Sugar Factory

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

बातम्या

Sugar Factory । राज्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली, त्यात काही भागात चांगला पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक घेतले जाते. परंतु यावर्षी पावसामुळे उसाचे उत्पादन (Sugarcane production) कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवरही होणार आहे. अशातच ऊस उत्पादक शेतकरी गळीत हंगामाची (Fall season) आतुरतेने वाट पाहत आहेत.

Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

येत्या 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे, परंतु अजूनही गळीत हंगामाची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. याच संदर्भात येत्या पाच सहा दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत यावर्षीच्या गळीत हंगामाची तारीख ठरवली जाईल, अशी माहिती साखर संकुलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

साखरेचे उत्पादन कमी होणार

पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील उसाच्या पिकाला मोठा फटका बसला. राज्यात सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरणार नाही. त्यामुळे ऊस आणि साखरेचे उत्पादन कमी होणार आहे.

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

किती कारखान्यांना मिळाली परवानगी?

सध्या राज्यात 211 कारखाने चालू आहेत. यंदाच्या वर्षी राज्यभरातून आत्तापर्यंत 217 कारखान्यांचे क्रशिंग अर्ज प्रशासनाकडे आले असून गळीत हंगामाची तारीख जाहीर झाल्यानंतर या कारखान्यांना परवानगी दिली जाईल, अशी माहिती विकास शाखेच्या सचिन बऱ्हाटे यांनी दिली आहे.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *