Sugar Factory Maharashtra

Sugar Factory Maharashtra । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश

बातम्या

Sugar Factory Maharashtra । मागच्या काही दिवसापासून साखर कारखाने कधी चालू होतील याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर एक नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.

Israel Agriculture Techniques | इस्रायलमध्ये लोक वाळवंटात मासेमारी कशी करतात? जगप्रसिद्ध इस्रायली शेतीतंत्र जाणून घ्या

पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना हंगाम सुरू होण्यापूर्वी मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. (Sugar Factory Maharashtra)

Brush Cutter | गवत, चारा आणि पीक कापणी करणारे ब्रश कटर यंत्र तुम्हाला माहित आहे का? आंतरमशागतीसाठी सुद्धा होतो उपयोग!

राज्यातील अनेक असे कारखाने आहेत जे प्रदूषणाचे नियम पाळत नाहीत त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांवर याचा थेट परिणाम झाला असल्याच्या = बाबी कित्येक वेळा समोर आल्या होत्या. आता याच गोष्टीचा विचार करून राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sugarcane Farming | ऊसाचे उत्पादन न निघणाऱ्या भागात लागवड करून कमावले लाखो रुपये! वाचा ‘या’ शेतकऱ्याची कमाल

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कमलेश सिंग (Kamlesh Singh) यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, 45 साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास या कायद्याच्या कलम 5 नुसार कोणताही कारखाना बंद करणे, कारखान्याचे वीज पाणी, तोडणे त्याचबरोबर अन्य सुविधा बंद करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *