Success Story । मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेच काम अवघड नसते. याच जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज अनेकजण गरुडझेप घेत आहेत. जसजसा काळ बदलत गेला तसतशा महिला देखील भरारी घेऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोणत्याच क्षेत्रात त्या मागे राहिल्या नाहीत. घवघवीत यश मिळवून त्या समाजापुढे एक आदर्श निर्माण करत आहेत.
बिहारमधील बेगुसराय येथील एका महिला शेतकऱ्याने भरघोस यश (Farmer Success Story) मिळवले आहे. त्या प्रत्येक वर्षी 7 लाख रुपयांची कमाई करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या दोन एकर जमिनीत तब्बल 11 प्रकारच्या भाजीपाल्याची शेती केली आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीने त्यांनी ही कामगिरी केली आहे. कुमकुम देवी असे या महिला शेतकऱ्याचे (Female farmers) नाव आहे. अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी ही कामगिरी केली आहे.
Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती
अशी केली सुरुवात
त्यांच्या पतीला पारंपारिक शेतीतून अपेक्षित कमाई करता येत नव्हती. इतकेच नाही तर त्यांच्याकडे मुलांना शिकवायला पैसे देखील नव्हते. त्यामुळे आजूबाजूच्या काही महिलांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून उपलब्ध केळीच्या पिकाबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या अर्धा एकर जमिनीत केळीची लागवड (Vegetable Farming) केली. त्यासोबत त्यांनी भेंडी, टोमॅटो, मुळा, लिंबू, हिरवी मिरची वांगी आणि कोबी अशा 11 भाजीपाल्याची लागवड केली.
उत्पन्नाचे साधन
त्या बेगुसराय जिल्हा मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या मटिहानी ब्लॉकमध्ये करतात. त्यांचे वय 39 वर्ष आहे. त्यांचे प्रामुख्याने हिरव्या भाज्या आणि केळी हे उत्पन्नाचे साधन आहे. केळीतून त्यांना चांगली कमाई करता येतात. बाजारात दर आठवड्याला 10 ते 15 हजार रुपयांचा भाजीपाला विकत असल्याचे त्यांचे मत आहे. यातून त्यांच्यावर असणारे कर्ज फेडण्यास मदत होत आहे.
Sugarcane Rate । अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश! टनामागे मिळणार १०० रूपये जास्तीचा दर
महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. क्षेत्र कोणतेही असो, त्यात त्या मागे नाहीत. संरक्षण दल, उद्योग, व्यवसाय असो किंवा मग राजकाराण, समाजकारण, शेती अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत कुमकुम देवी यांनी लाखो रुपयांची कमाई करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट