Success Story

Success Story । ऊस उत्पादकाची कमाल! अवघ्या 18 गुंठ्यात 57 टन घेतले उत्पादन, कसं केलं नियोजन? जाणून घ्या

यशोगाथा

Success Story । ऊस (sugarcane) हे जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी उसाचे उत्पादन (Sugarcane production) घेतात. विविध तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतीमुळे शेतकरी या पिकातून भरघोस कमाई करताना दिसत आहेत. उसाच्या देखील अनेक जाती (Varieties of sugarcane) आहेत. काही जातीमुळे उसाचे चांगले उत्पादन मिळते. तंत्रज्ञानाची मदत घेत शेतकरी विविध प्रयोग करत आहेत.

Agri Schemes । शेती अवजारांच्या अनुदान योजनेतील गैरप्रकाराला बसणार आळा, जाणून घ्या सरकारची भन्नाट आयडिया

एका तरुण शेतकऱ्याने अवघ्या 18 गुंठ्यात 57 टन उत्पादन घेतले आहे. उदय पाटील (Uday Patil) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या वाघवे या गावातील ते रहिवासी आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी फक्त उसाच्या पिकातून (Sugarcane crops) कमाई केली नाही तर इतर पिकातून देखील चांगली कमाई केली आहे.

Onion Rate । हृदयद्रावक! कांद्याला चक्क १ रुपये दर, शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट

आंतरपिकातून केली बक्कळ कमाई

मेथी, भुईमूग आणि मिरची सारख्या आंतरपिकातून त्यांनी सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. म्हणजेच उदय पाटील यांनी 50 हजार रुपये खर्च करून अडीच लाख रुपयाचा नफा मिळवला आहे. उदय पाटील हे खाजगी नोकरी करत असून त्यांना शेतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा छंद आहे. यातूनच त्यांनी एका गुंठ्याला तीन टनापेक्षा जास्त उसाचे उत्पादन घेतले आहे.

Bhandara News । धक्कादायक बातमी! शेतात तीन महिलांवर मधमाशांचा भयानक हल्ला, तिघीही गंभीर जखमी

कस केलं नियोजन?

उसासाठी त्यांनी दहा ट्रॉली शेणखत घालून उभी आडवी नांगरणी करून दक्षिण उत्तर अशी चार फुटांची सरी सोडली. त्यात त्यांनी 86032 या उसाच्या जातीची दीड फुटावरती एक डोळा पद्धतीने लागवड केली. दरम्यान, या उसाची तोड काही दिवसांपूर्वी केली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले. आंतर पिकापासून सव्वा लाख तर ऊसापासून अडीच लाख असे 18 गुंठात तीन लाखांचे उत्पादन मिळाले आहे.

Sugarcane Growth । पशुपालकांनो सावधान! तुम्हीही जनावरांना जास्त प्रमाणात उसाचे वाढे चारताय का? ही बातमी एकदा वाचाच

50 हजार रुपये खर्च जाऊन त्यांना अडीच लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना भुईमूग आणि मिरचीच्या आंतरपीकाने सर्वात मोठा आर्थिक फायदा केला आहे. त्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अनेक तरुणवर्ग नोकरी सोडून शेती करत आहेत. त्यात त्यांना नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येत आहे.

Animal Husbandry । जनावरातील दूध उत्पादनात घट येण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे; पशुपालकांनो वाचा तुमच्या फायद्याची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *