Success story

Success Story । आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज ‘ही’ महिला शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल; संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

सेंद्रीय शेती

Success story । शेतीला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणवर्ग देखील लाखो रुपये असणारा पगार सोडून शेती करत आहे. मेहनत आणि आधुनिकतेच्या जोरावर आता शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ लागली आहे. फक्त पुरुष नाही तर आता महिला देखील शेतीतून प्रचंड कमाई करत आहेत. अशीच एक महिला शेतकरी आहे जी 50 लाखांची उलाढाल करत आहे.

Milk Rate | दूध उत्पादकांना मोठा झटका! गायीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांनी झाली घसरण, जाणून घ्या नवे दर

सेंद्रीय शेतीला सध्या प्राधान्य दिले जात आहे. कारण सध्या रासायनिक खतांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रुबी पारीक या महिला शेतकऱ्याने 15 वर्षांच्या कठोर मेहनतीने यशस्वी सेंद्रिय शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी

प्रतिकूल परिस्थितीवर केली मात

रुबी पारीक यांच्या जन्माच्या एका वर्षानंतर वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आजारपणामुळं त्यांना जमीन विकावी लागली. पाच भावंडे असल्याने रुबी पारीक यांना दहावीपर्यंत शिक्षण घेता आले. त्यानंतर 2004 मध्ये, दौसा जिल्ह्यातील खटवा गावात राहत असणाऱ्या ओम प्रकाश पारीक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी हळूहळू शेती करायला सुरुवात केली. या कामात त्यांना त्यांच्या पतीची मोलाची साथ मिळाली.

Havaman Andaj । सावधान! राज्यासह देशातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

तयार केले 200 मेट्रिक टन कंपोस्ट युनिट

पुढे त्यांनी त्यांच्याच गावात 2008 साली कृषी विज्ञान केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ यांच्याकडून सेंद्रिय शेतीचे (Organic farming) प्रशिक्षण घेतले, आणि पतीच्या मदतीने सेंद्रिय शेतीत नवीन प्रयोग करण्याचे ठरवलं. आज त्यांनी गहू, बाजरी, हरभरा, गवार, भुईमूग, बार्ली ही पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली आहेत. त्यांच्या प्रगतीमुळे पुढे त्यांना फार्मर्स क्लबचे अध्यक्ष देखील बनवले. त्यांच्याच गावात त्यांनी 200 मेट्रिक टन कंपोस्ट युनिट तयार (Organic farming information) केले आहे.

Land Rule । काय सांगता! शेतीचा बांध कोरला तर कारवाई होते? महत्त्वाचा नियम एकदा वाचाच

शिवाय त्यांनी गांडूळ खत तयार करण्यासोबत गांडूळ संगोपन केले जात आहे. या युनिटमुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट उपलब्ध होत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अझोला उत्पादन युनिट स्थापन केले आहे. शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक उलाढाल 50 लाख रुपये इतकी आहे.

Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *