Success Story

Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक

यशोगाथा

Success Story । शेतकऱ्यांची आता अलीकडच्या काळात शेती करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पिके घेत असायचे. परंतु या पिकांना प्रत्येक वर्षी हमीभाव मिळतोच असे नाही. कालांतराने या पिकांचा भाव पडत चालला आहे. आता आधुनिक पिकांना चांगला भाव मिळत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) राबवत आहेत.

Mulching Paper Subsidy । ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळत आहे प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ

विशेष म्हणजे याच योजनेच्या माध्यमातून एक ट्रॅक्टर चालक राईस मिलचा मालक झाला आहे. परशराम असे या व्यक्तीचे नाव आहे. ते तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील फाजुलनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी दलित बंधू योजनेचा (Dalit Bandhu Scheme) लाभ घेतला. योजनेमार्फत त्यांनी राईस मिलची खरेदी केली आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले.

Land Measurement । जमीन मोजणीसाठी किती खर्च येतो? अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशी केली सुरुवात

शाळा सोडून त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारी मजूर म्हणून काम केले. परशराम लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. ट्रॅक्टर चालवायला शिकून त्यांनी 2012 पासून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायला सुरुवात केली. सोबतच त्यांनी भात कापण्याच्या यंत्रावरदेखील काम केले आहे. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी गावचे सरपंच नागुला वेणुगोपाल तसेच माजी एमपीटीसी गड्डाम हनुमांडुलु यांच्या मदतीने मोबाईल राईस मिल युनिटसाठी एक अर्ज केला.

Milk Price । ऐन सणासुदीत पशुपालकांचं गणित बिघडलं! दुधाच्या किमती कमी आणि चारा महागला

दलित बंधू अंतर्गत त्यांना युनिट मंजूर झाले. परंतु 10 लाख रुपयांच्या युनिट खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळं त्यांनी अतिरिक्त मदतीसाठी जिल्हाधिकारी अनुराग जयंती यांच्याशी संपर्क केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना युनियन बँक ऑफ इंडियामधीन दोन लाख 50 हजार रुपयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच उरलेले 1.50 लाख रुपये उभे करून त्यांनी युनिटची खरेदी केले.

Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार

कमाई

एक क्विंटल तांदूळ मिलिंगसाठी 300 रुपये आकारण्यात येतात. यातून ते दररोज 1 हजार 800 रुपये कमवत आहेत. एका दिवसासाठी डिझेलसाठी 500 रुपये सोडून त्यांना 1 हजार 300 रुपयांचा नफा मिळतो. ऑफ सिझनमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने बिगर शेतीची कामेही करतात. असे मिळून ते दरमहा 10,000 रुपये कमावत आहेत.

Baramati Doodh Sangh । बारामती दूध संघाने दिलेल्या बोनसमुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *