Success Story

Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा

यशोगाथा

Success Story । भारतातील तरुण पिढीचा विचार हळूहळू शेतीकडे बदलत आहे. तरुणांनी चांगल्या नोकऱ्या सोडून शेती स्वीकारल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अनेकजण नोकरी करण्यापेक्षा शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. शेती जर योग्य नियोजनाने केली तर त्यामधून चांगला नफा मिळतो म्हणून अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरी ऐवजी शेती करतात. अनेक तरुण शेती करून लाखोंची कमाई करत आहेत. अशीच एक गोष्ट उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी असलेल्या गुरलीन चावलाची आहे. जिने तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. आज गुरलीन यशस्वी शेती (Successful farming) करून लाखोंची कमाई करत आहे. तिच्या मेहनतीमुळे गुरलीन नापीक जमिनीतून चांगले पैसे कमवत आहे. गुरलीनने शेती सुरू केली तेव्हा तिच्याकडे जमिनीचा एक तुकडा नापीक होता. जी तिने शेतीसाठी योग्य केली आणि आज ती त्याच जमिनीवर तिची पिके घेत आहे. (Success Story)

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

लॉकडाऊनपासून प्रवास सुरू

गुरलीनने सांगितले की, तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे नापीक जमिनीवर तिने स्ट्रॉबेरीची लागवड (Cultivation of strawberries) सुरू केली. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिने रात्रंदिवस मेहनत केली. गुरलीनने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात तिला ही कल्पना आली, जेव्हा ती झाशी येथे तिच्या घरी होती. तिला स्ट्रॉबेरी खूप आवडतात. पण, लॉकडाऊनच्या काळात जेव्हा स्ट्रॉबेरी उपलब्ध नव्हत्या, तेव्हा तिने घरीच वाढवण्याचा विचार केला.

Havaman Andaj । अवकाळी पाऊस घालणार थैमान, मराठवाड्यासह नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

एक प्रयोग म्हणून गुरलीनने घरातील काही कुंड्यांमध्ये पहिल्यांदा बिया पेरल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तिने वडिलांना याची माहिती दिली आणि त्यांच्या फार्म हाऊसमधील ओसाड जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. गुरलीनने सांगितले की, सुरुवातीला तिने छोट्या जागेपासून सुरुवात केली. पण, आज ती दीड एकरात शेती करत आहे.

Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले

पीएम मोदींनीही कौतुक केले

गुरलीनने सांगितले की, तिने झाशी ऑरगॅनिक्स नावाची वेबसाइटही तयार केली आहे. जिथे लोक ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसोबतच गुरलीन अनेक भाज्याही पिकवत आहे. गुरलीनने सांगितले की, तिने दीड एकर शेतीपासून सुरुवात केली आणि आज ती 7 एकर जमिनीवर शेती करत आहे.

Cabinet Meeting । आत्ताची सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले धडाकेबाज निर्णय; वाचा एका क्लिकवर

झाशीमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केल्यानंतर गुरलीनने प्रशासन आणि सरकारचे कौतुकही केले आहे. गुरलीन प्रामुख्याने चर्चेत आली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचा उल्लेख मन की बातच्या 73 व्या आवृत्तीत केला आणि तिची भरभरून प्रशंसा केली. गुरलीन सांगते की आज ती यशस्वी शेती करून लाखोंची कमाई करत आहे.

Success Story । सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल! एकरी घेतले ९७ टन उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *