dragon fruit farming

Success Story । शिक्षकाने करून दाखवलं! माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पाहा कसं केलं नियोजन?

यशोगाथा

Success Story । शेतकरी पारंपारिक शेती सोडून शेतीमध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करताना दिसत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकरी कमी खर्चात तसेच कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न घेतले आहे. त्याचबरोबर नवनवीन फळांची लागवड शेतकरी चांगला पैसे कमवत आहेत. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहोत जो शिक्षक असून देखील त्याने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे. (dragon fruit farming)

सध्या आपल्याकडे ड्रॅगन फ्रुटची शेती अनेक शेतकरी करत असल्याचे दिसत आहे. या शेतीमधून चांगला नफा मिळत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे वळला आहे. सध्या एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शेतकऱ्यांने माळरानावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याच शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा देखील होत आहे.

या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित सात एकर जमीन असून त्यापैकी एक एकर जमिनीवर त्याने गेल्या वर्षी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. आता यावर्षी बागेला फळे लागायला सुरुवात झाली झाली आहे. ज्ञानोबा गंगाधर मजर असे या शेतकऱ्याचे नाव आह. हा शेतकरी प्राथमिक शाळेत शिक्षक असून त्याने आपल्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग केला आहे. त्यामुळे सगळीकडे या शेतकऱ्याच्या चर्चा होताना दिसत आहे.

नेमकं कसं केलं नियोजन?

कोणतीही शेती करायचं म्हटलं तर त्याच योग्य नियोजन असेल तर आपल्याला त्यामधून नफा देखील चांगला मिळतो त्यामुळे शेती करताना त्याचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये ११ बाय ६ फुटी याप्रमाणे एक एकर मध्ये 525 सिमेंट पोल रिंग पद्धतीने उभा केले आणि त्यांनी जवळपास २१०० रोपांची लागवड केली. मागच्या वर्षी त्यांनी याची लागवड केली असून सध्या फळ देखील सुरू झाले आहे. त्यांनी यासाठी ठिबक सिंचन केले असून त्यांना या सर्व गोष्टींसाठी जवळपास अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे

सध्या त्यांचे ड्रॅगन फ्रुटची फळे सुरू झाली आहेत. यामुळे जर बाजारभावाप्रमाणे ही फळे विकली तर त्यांना जवळपास दोन लाख रुपये उत्पन्न येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर हे फळ शेतकरी थेट नागरिकांकडे जाऊन विकणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *