Success story । पारंपरिक पिके न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेतली तर त्याचा फायदा होतो. कारण प्रत्येक वेळेस पारंपरिक पिकांना बाजारात चांगला भाव असतोच असे नाही. बऱ्याचदा बाजारभावाविना शेतकऱ्यांना पिके फेकून द्यावी लागतात. त्यामुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. (Flower farming)
Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर
खास करून दसरा आणि दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर झेंडूसह (Marigold cultivation) इतर फुलांना चांगली मागणी असते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. दरम्यान, अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर आणि परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आहे. झेंडू आणि शेवंतीमुळे नक्कीच या शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
Heligan Pineapple । ‘हे’ आहे जगातलं तिसरं सर्वाधिक महागडं फळ, किंमत जाणून व्हाल हैराण
यंदा राज्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. पावसाअभावी अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अकोळनेर या गावांतील शेतकऱ्यांनी रंगबिरंगी फुलांची लागवड केली आहे. झेंडू, शेवंती, जरबेरा आणि अस्टर सारख्या फुलांची लागवड केलेली आहे. तसेच भोरवाडी तसेच कास व कामरगाव या परिसरात देखील फुलांचे उत्पादन घेण्यात येते.
Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! ‘या’ भागात हवामान खात्याने दिला जोरदार पावसाचा इशारा
चांगली मागणी
झेंडूच्या फुलांमध्ये कलकत्ता तसेच जम्बो, मारीगोल्ड, गोल्ड स्पॉट, अष्टगंधा तसेच पितांबरी यासारख्या वेगवेगळ्या जाती आहेत. येथील फुलांना दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, नागपूर, मुंबई आणि बडोदा अशा मोठं-मोठ्या शहरांमधून चांगली मागणी आहे. त्यामुळे यावर्षी या शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल.
Government Scheme । शानदार योजना! आता ‘या’ लोकांना मिळणार कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज