Success story

Success story । प्रेरणादायी! मुलाने फेडले कष्टाचे पांग, मेहनतीच्या जोरावर झाला पीएसआय

यशोगाथा

Success story । अनेकजण कुटुंबाची आर्थिक अनुकूल परिस्थितीवर मात करून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश मिळवतात. अनेकांना दोन वेळचे जेवण मिळत नसताना उत्तुंग कामगिरी करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार (Sugarcane worker) म्हणून राबणाऱ्या आपल्या आई आणि वडिलांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षकपदाला (Sub-Inspector of Police) गवसणी घालून त्यांच्या कष्टाचे पांग फेडले आहे.

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

राज्यातील बीड (Beed) हा दुष्काळी जिल्हा म्हणून सगळीकडे ओळखला जातो. स्थलांतर करत या जिल्ह्यांत ऊसतोडीच्या कामाला (Sugarcane) जाऊन मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. ओम भागवत आघाव (Om Agahv) यांनी मेहनत करत पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. आघाव कुटुंबाच्याही नशिबी आला. ओमचे आई-वडील चार मुलांची जबाबदारी खांद्यावर असल्याने खूप राबराब राबले.

E-Crop Registration । आता एकाच ॲपद्वारे ई-पीक नोंदणी सातबारावर होणार; जाणून घ्या

पहिल्यांदा पोलीस शिपाई म्हणून निवड

ओम यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पुढचे शिक्षण द्यायचे म्हणून वडील दिवंगत भागवत आघाव यांनी पत्नीला घेत थेट गुजरात गाठले. त्यांच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून ओम यांना स्वस्थ बसता येत नव्हते. त्यांनी बारावी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी पोलिस भरतीची जाहिरात वाचली. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अर्ज भरला आणि त्यांना शिपाई म्हणून नोकरी मिळाली.

Hydroponics Technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

सत्यात उतरले अधिकारी होण्याचे स्वप्न

पण त्याचवर्षी वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट आले. या धक्क्याने ते पूर्णपणे खचून गेले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले. ओम आघाव हे उपनिरीक्षक झाले आणि त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले. त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

ज्यांनी या स्वप्नपूर्तीसाठी घाम गाळला तेच हे आनंदाचे क्षण पाहण्यासाठी ते आपल्या वडिलांच्या आठवणीने कासावीस झाले. अकादमीच्या मैदानावर आईजवळ येताच ओम त्यांच्या गळ्यात पडून खूप रडले. उपनिरीक्षक म्हणून आता सेवा बजावत असताना गरीब जनतेला न्याय देणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीवाचे रान करणे. आपल्या आई-वडिलांसह महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचवायचे, हेच ध्येय ओम यांच्या मनाशी आहे.

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *