Success Story । नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डाळिंबासाठी (Pomegranate Farming) प्रसिद्ध असणारा पट्टा असून येथे अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाळिंबावर सतत कोणत्या कोणत्या रोगाचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. अनेक शेतकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येतात. अशाच एका ऊसतोड कामगाराने डाळिंबातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
रवींद्र पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मालेगाव तालुक्यातील सातमाने या गावातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे त्यांची ‘डाळिंब मास्टर’ म्हणून ओळख आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित घरची अडीच एकर कोरडवाहू जमीन होती. त्यात जेमतेम धान्य पिकायचे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांच्यावर वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. शिक्षण सोडून मिळेल ते काम करायला त्यांनी सुरुवात केली. (Pomegranate Farming Information)
Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…
त्यांनी 1983 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे आणि विहीर खोदण्याचे कामे केली. 1984 ते 87 या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत रावळगाव साखर कारखाना ऊसतोड मजूर म्हणून काम केले. पुढे त्यांनी आई आणि पत्नीच्या मदतीने घरच्या घरीच विहीर खोदली. त्यांच्याकडे मोटार घेण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्यांच्या मदतीला त्यांचे सासरे धावून आले आणि तिथून त्यांचा प्रवास सुरु झाला.
Onion Price Hike । कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! कांद्याच्या दरात विक्रमी वाढ
अशी केली सुरुवात
विशेष म्हणजे त्यांच्याकडे डाळिंबाच्या लागवडीसाठी पैसे नसल्याने त्यांनी आपल्या लहान मुलाच्या सोन्याच्या बाळ्या विकून पैसे उभारले. या पैशातून त्यांनी 30 गुंठे मुरमाड जमिनीवर गणेश या डाळिंबाच्या वाणाची एकूण 150 झाडे लावली. परंतु, डाळिंब लावल्यांनंतर दुसऱ्याच वर्षी दुष्काळ पडला. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बैलगाडीतून घागरीत पाणी भरून ते डाळिंबाला पाणी दिले.
कमाई
पहिल्यांदा त्यांना 11 हजारांची कमाई करता आली. त्यांनी डाळिंबासोबत मोसंबी, संत्री आणि आंबा अशी मिश्र लागवड केली. परंतु त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. शिवाय त्यांनी स्ट्रॉबेरी, कांदा, पपई, शेवगा आणि सीताफळ तसेच कारनेशन व लिली तसेच जरबेरा यांची लागवड केली. विशेष म्हणजे आज त्यांच्याकडे 60 एकर शेती व कराराने घेतलेली तीस एकर अशी 85 एकर शेती आहे, यात त्यांनी डाळिंबाची लागवड केली असून ते करोडो रुपयांची कमाई करत आहे.