Success story

Success story । कांद्याच्या पट्ट्यात फुलवली केळीची बाग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पादन; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

यशोगाथा

Success story । शेतकरी आता शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. शेतकरी पूर्वी केवळ पारंपरिक पिके घेत असत. या पिकांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसायचे. पण शेतकरी आता आधुनिक पिके घेत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अशातच एका शेतकऱ्याने केळीची (Banana) बाग फुलवली आहे.

Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण

मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर (Onion price) कमालीचे पडले आहेत. शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. लासलगाव येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड (Cultivation of Onion) केली जाते. पण येथील एका शेतकऱ्याने चक्क कांद्याची लागवड न करता केळीची लागवड (Cultivation of Banana) केली आहे. त्यातून त्याला चांगला लाभ झाला आहे.

Government Schemes । क्या बात है! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 37500 रुपये, कसं ते जाणून घ्या

असे केले नियोजन

तानाजी आंधळे (Tanaji Andhale) यांनी जळगाव येथून जैन इरिगेशनच्या ‘टिशू कल्चर ग्रँड नाइन’ (Tissue Culture Grand Nine) या जातीची 6 हजार केळीची रोपे आणून त्यांची लागवड केली. योग्य ते नियोजन करत त्यांनी पाच एकरात केळीची बाग फुलवली आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी आठ बाय चार या अंतरावर दीड फुटाच्या बेडवर केळीची लागवड केली. विशेष म्हणजे पाण्यासाठी त्यांनी ठिबकची व्यवस्था केली आहे. त्याद्वारे ते खते देखील देतात.

Blue Fin Tuna Fish । ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा मासा…कोटींच्या घरात किंमत; माहिती वाचून व्हाल थक्क

लागवड केल्यांनतर त्यांनी केळी पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले. दरवर्षी प्रमाणे यंदाही कांद्याचा उत्पादन खर्चही निघाला नाही. परंतु त्यांनी हतबल न होता, मुख्य केळी पिकावर लक्ष केंद्रित केले. केळीच्या एका झाडाला जवळपास 37 ते 38 किलोंचे केळीचे घड आले आहे. पहिली तोडणी केली त्यावेळी 26 टन माल निघाला, आता दुसरा तोडा सुरु असून, त्यात 50 ते 55 टन माल निघाला आहे.

Kisan Credit Card । सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरात लाखो रुपयांचं कर्ज, जाणून घ्या योजना

अरब देशांमध्ये होते केळीची निर्यात

आणखी काही केळी शिल्लक असून, असे एकूण यावर्षी 150 ते 155 टन केळीचे उत्पादन होईल. केळी पिकाला त्यांना साडेसात लाख रुपये इतका खर्च आला आहे. उत्पादन खर्च वजा करून, 27 ते 28 लाखांचे उत्पन्न मिळेल असे, शेतकरी तानाजी आंधळे सांगतात. विशेष बाब म्हणजे त्यांनी लागवड केलेली केळी अरब देशांमध्ये निर्यात केली जाते. ज्याचा त्यांना फायदा होतो.

Agricultural Exhibition । ऐकावे ते नवलच! तंत्रज्ञानाचा डबल फायदा, टोमॅटोच्या झाडाला बटाटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *