Success Story

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

यशोगाथा

Success Story । सध्या अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र यामध्ये असे काही जण आहेत जे चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना यातून चांगले पैसे मिळत आहेत. काही तरुण परदेशातील नोकरी सोडतात आणि गावाकडे येऊन शेती करतात. काहीजण तर सरकारी नोकरी (Govt job) देखील सोडायला तयार असतात. (Young Farmer Success Story)

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

सध्याचे तरुण शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करू लागले आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या तरुणाने चक्क पोलीस खात्यातील नोकरी (Police job) सोडून तूर शेती (Tur farming) करण्याचा निर्णय घेतला. अविनाश कुमार (Avinash Kumar) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Mini Tractor Subsidy । आता 90% अनुदानावर करा मिनी ट्रॅक्टर खरेदी, ‘या’ ठिकाणी करा तातडीने अर्ज

सरकारी नोकरीला मारली लाथ

ते उत्तर प्रदेशमधील (UP) गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी असून 1998 मध्ये उत्तरप्रदेश पोलीस दलात भरती झाले होते. परंतु, शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी 2005 साली पोलीस दलातील पदाचा राजीनामा दिला. त्यांनी तुरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करण्यात येते. यात चांगला नफा मिळतो.

Buffalo Vs jersey cow milk । म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी का फायदेशीर असते? जाणून घ्या

यावर्षी अविनाश कुमार यांनी जवळपास 11 एकर शेतीमध्ये तुरीची लागवड केली असून त्यांना एकरी 27 ते 30 हजार रुपयांचा निव्वळ नफा होतोय. एकंदरीतच 11 एकरातील एकूण तुरीमधून वार्षिक 3 ते 3.5 लाख रुपयांची कमाई होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी या तुरीची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे. उत्पादन खर्च वगळता काहीही कष्ट न घेता ही कमाई केली आहे.

Havaman Andaj । नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची दमदार हजेरी, राज्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

दिली 25 कृषी विद्यापीठांना भेट

शिवाय अविनाश हे औषधी वनस्पतींची शेती करत आहेत. ते विविध पिकांवर संशोधन करतात. यातून ते तुरीच्या प्रामुख्याने दोन प्रजातींची शेती करत असून यातील एक प्रजाती 120 से 140 दिवसांमध्ये काढणीला येते. या प्रजातीची लागवड त्यांनी जुलै महिन्यामध्ये केली आहे, दुसऱ्या प्रजातीची लागवड त्यांनी आपल्या सर्व शेतीच्या बांधावर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी 25 कृषी विद्यापीठांना भेट दिली आहे.

Crorepati Farmer । एका झटक्यात शेतकरी झाला करोडपती, बँक पासबूक अपडेट केलं आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *