Success Story । आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक स्वप्न असते. चांगली नोकरी, चांगली गाडी आणि छान बंगला घ्यायचा. पण काही लोक उलट विचार करतात. ज्यांना फक्त आपल्या कुटुंबाचा आधार हवा असतो. त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून दूर राहता येत नाही. अशीच एक कहाणी आहे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका तरुणाची, जी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. राजस्थानमधील रहिवासी रजनीश कुमार या तरुणाने चांगले शिक्षण घेतले आणि देशातच नव्हे तर परदेशी कंपन्यांमध्येही काम केले. मात्र यामध्ये समाधान मिळत नसल्याने त्याने घरी येऊन सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. आज आपण याच तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. (Success Story)
नोकरी सोडून शेती करण्याच्या घेतला निर्णय
रजनीश कुमार यांचे प्राथमिक शिक्षण अलवर शहरातील सरकारी कांकरिया या सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अजमेरच्या महर्षि दयानंद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तीन वर्षे CAS कोर्स केला. त्यामुळे त्यांना CAS मध्ये नोकरी मिळाली. काही दिवस काम केल्यानंतर त्यांना लंडनच्या एका कंपनीकडून चांगली ऑफर मिळाली. त्यानंतर त्यांनी सीएएसची नोकरी सोडून लंडनला जाऊन तेथील एका मोठ्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. लंडनमध्ये काम करत असताना वेळ निघून गेला आणि तीन वर्षे गेली. यानंतर त्यांना घरच्या आठवणी सतावू लागल्या.
रजनीश कुमार हे आपल्या आई-वडिलांचे खूप लाडके होते. त्यामुळे त्यांनी लंडनमधील नोकरी सोडून आपल्या देशात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लंडनमधली नोकरी सोडून दिल्लीमध्ये एका कंपनीत 25 लाखांच्या वार्षिक पॅकेजसह नोकरी मिळाली. पूर्वीप्रमाणेच यावेळीही तो आकर्षक पॅकेजेसमुळे खूश नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर ते आता त्यांच्या घरी परतले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला.
रजनीश यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना ते म्हणतात की, शेतात बाजरी, गहू, कापूस आणि इतर विविध प्रकारच्या भाज्या पिकवतात. त्यासाठी तो सेंद्रिय खतांचा वापर करतो. यामुळे उत्पन्न चांगले निघत असून त्यांना चांगला नफा मिळत आहेत.
कमाई
रजनीश यांच्याकडे एकूण 10 एकर जमीन आहे. त्यांचे वडील व्यवसायाने शेतकरी होते, पण त्यांना शेतीच्या या बदलत्या पद्धतीची माहिती नव्हती. रजनीश यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आणि नवीन शेती उपकरणे देखील वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता ते दरवर्षी अंदाजे 35 ते 40 लाख रुपये कमवतात.