Success story । सध्याच्या काळात काही तरुण शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे ते पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यापैकी काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता यशस्वी शेती करत आहेत. परंतु, त्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
Sugarcane Farmer News । धक्कादायक! शॉर्ट सर्किटने ३५ एकर उसाची राखरांगोळी, झाले ५० लाखांचे नुकसान
कोरोनामुळे गमावली नोकरी
एका पायाने अपंग असणाऱ्या तरुणाने कोरोना काळात आपली नोकरी गमावली, तरीही त्याने हार मानली नाही. अमोल राजाभाऊ यादव असे या तरुणाचे नाव आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकुरका येथील रहिवासी आहेत. (Successful Farmer News) प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने केळीची लागवड (Cultivation of Banana) करून त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. समाजापुढे त्याने एक आदर्श निर्माण केला आहे.
Cotton Export । अर्रर्र! 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत घसरण, जाणून घ्या यामागचं कारण
आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अमोल यादव यांनी नववी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी पुढे पुण्यातील एका कंपनीत ड्रायव्हरची नोकरी केली. परंतु त्यावेळी कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली. नोकरी गेल्याने ते खूप निराश झाले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यांनी परत आपल्या गावी येण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या गावी येऊन शेती करू लागले.
परदेशात मागणी
त्यांनी दीड एकर जमिनीत केळीची लागवड केली. परंतु अचानक पाण्याचा प्रश्न उभा राहिला. त्यांनी टँकरने केळीला पाणी दिले. केळीच्या बागेत त्यांनी आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली. त्यांची केळी दुबई, इराक यांसारख्या देशांत विक्रीसाठी पाठवली जाते. त्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई करता आली आहे.
Success story । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! लिंबाच्या अवघ्या 10 झाडांमधून घेतले लाखोंचे उत्पन्न