Success Story

Success Story । शेतकऱ्याची कमाल! अवघ्या दीड महिन्यात 40 गुंठे कोथिंबिरीतून घेतले तीन लाखांचे उत्पन्न

यशोगाथा

Success Story । शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार सतत कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. ज्याचा फायदा देशभरातील करोडो शेतकरी वर्गाला होतो. बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य तो हमीभाव न मिळाल्याने कर्ज घ्यावे लागते. परंतु, आता तुम्ही जर योग्य नियोजन करून शेती केली तर तुम्हाला भरघोस उत्पन्न घेता येईल.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतेय पीएम किसानची रक्कम

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निलेश माळुंजकर या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून (Coriander Crop) अवघ्या दीड महिन्यात तीन लाख रुपयांचं उत्पन्न घेतले आहे. 40 गुंठे जमिनीवर त्यांनी यशस्वी उत्पन्न घेतले असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना शेतातच 100 रुपये किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे माळुंजकर कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. (Farmer Success Story)

Success story । शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळावर मात करत गुगल, युट्युबच्या मदतीने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती

असे केले नियोजन

निलेश माळुंजकर यांनी बेडवर कोथिंबीरीची लागण करून त्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिले. कोथिंबीरीत जास्त पाणी होऊ नये म्हणून त्यांनी अशी व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे निलेश माळुंजकर यांना शिवाजी आवटे या शेतकऱ्याने मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोथिंबीर पिकाची संपूर्ण लागवड केली.

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

खर्च

निलेश माळुंजकर यांनी एक एकरामध्ये 35 किलो गौरी वाणाच्या बियाण्याची लागवड केली आहे. त्यांना लागवड आणि खतांचा खर्च एकूण खर्च 35 हजार रुपये इतका आला आहे. दीड महिन्यानंतर निलेश माळुंजकर यांची कोथिंबीर व्यापाऱ्यांनी शेतातच तीन लाख रुपयांना विकत घेतली. त्यांना संपूर्ण खर्च वजा करता निव्वळ 2 लाख 65 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *