Success Story

Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा

यशोगाथा

Success Story । काम कोणतेही असो कष्टाशिवाय पर्याय नसतो. जर तुम्ही जास्त कष्ट केले तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळते. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. काही शेतकरी आधुनिक पिके (Modern crops) घेऊ लागले आहेत. याचा त्यांना फायदा होत आहे. विशेष बाब म्हणजे आता तरुण वर्ग देखील नोकरी न करता शेती करत आहेत. यात त्यांना शेतीपेक्षा जास्त कमाई करता येते.

Subsidy for Well । मोठी बातमी! आता विहिरीसाठीही मिळेल अनुदान, ग्रामपंचायतीत द्यावा लागेल प्रस्ताव

अशातच एका तरुणाने शेतीत शिमला मिरचीचे (Capsicum) पीक घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. अजित चंद्रशेखर खांडगौरे (Ajit Chandrasekhar Khandgaure) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी उच्च शिक्षण घेतले असून अनेकवेळा त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत

अशी केली सुरुवात

खांडगौरे यांची गावाच्या बाजूलाच तलावाच्या काठी ३ एकर मुरमाड शेती आहे. यामध्ये ते पूर्वी पारंपरिक पद्धतीने भुईमूग, ज्वारी, कपाशी, तूर आणि मका ही पिके घ्यायचे. २०२२ मध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर शेडनेड उभारून त्यात लाल पिवळी शिमला मिरचीचे (Capsicum income) पहिल्यांदा उत्पादन घेतले. बाजारभाव आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे त्यांना फक्त उत्पादन खर्च काढता आला.

Brinjal Rate । वांग्याने मोडले सर्व विक्रम! जाणून घ्या दर

शेती तज्ज्ञांची घेतली मदत

तरीही हार न मानता त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. सोशल मीडियाद्वारे शेती तज्ज्ञांशी संपर्क केला. त्यांच्या मार्गदर्शनातून आज त्यांनी शिमला मिरचीचे यशस्वी उत्पादन मिळवले आहे. आज त्यांनी पिकवलेल्या शिमला मिरचीची नाशिक आणि पनवेल येथील बाजारात विक्री होत आहि. व्यापारी जागेवर मिरचीची खरेदी करत असल्याने विक्रीला कसलीच अडचणी येत नाहीत.

Land rule । तुम्हालाही जमीन नाही का? तर मग ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल जमीन

सध्या त्यांच्याकडे दोन शेडनेट आहेत. त्यापैकी एका शेडनेटमध्ये तणांचे नियंत्रण रहावे म्हणून मल्चिंगवर नुकतीच २० दिवसांपूर्वी प्लेडियन जातीच्या १५००० रोपांची लागवड केली असून दुसऱ्या शेडनेटमध्ये काकडी लागवड केली जाणार आहे. त्यांना खर्च वजा जाता वार्षिक ३ ते ५ लाख उत्पन्न शिमला मिरचीतून मिळत आहे. योग्य नियोजन आणि कष्टातून त्यांना भरघोस यश मिळाले आहे. शिवाय त्यांनी यंदा गांडूळ खत निर्मिती युनिट उभारले आहे.

Garlic Price । आनंदाची बातमी! लसणाने गाठला उच्चांक, किलोला मिळतोय 400 रुपये दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *