Success Story । सध्या निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे निसर्गावर आधारित असणारी शेती धोक्यात आली आहे. शेतीत पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नाही. अनेकजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र पाहता अनेकजण व्यवसाय सुरु करत आहेत. अशाच एका उच्च शिक्षित बंधूंनी मधमाशी पालन (Beekeeping) करून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
Agricultural Tips । घरबसल्या मिनिटात समजेल खत दुकानांमध्ये खत शिल्लक आहे की नाही, फक्त करा ‘हे’ काम
हे दोघे तरुण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अंबड येथील रहिवासी आहेत. राजू कानवडे आणि संदेश कानवडे असे त्यांचे नाव आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मधमाशी पालन व्यवसाय केला. यातून ते प्रत्येक वर्षी ४० लाखांची उलाढाल करतात. इतकेच नाही तर ते मधमाशांसोबत भारतभर भ्रमंती करतात.
Agriculture News । बापरे! किलोला मिळतोय 3 लाखांचा दर, आजच करा ‘या’ पिकाची लागवड
अशी केली सुरुवात
राजू भाऊसाहेब कानवडे यांनी बी.ए. आणि संदेश कानवडे यांनी बीई मेकॅनिकलची पदवी घेतली असून त्यांनी २००८ साली हा व्यवसाय सुरु केला. यासाठी परागी भवनाच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढवले. मध उत्पादन घेऊन त्यातून उपपदार्थ निर्मिती करुन आर्थिक उन्नती साधली. त्यांनी सुरुवातीला मधमाशांच्या २५ पेट्यांपासून व्यवसाय सुरू केला, हा व्यवसाय वाढून आता तो दीड हजारांपेक्षा जास्त पेटयांपर्यंत गेला आहे.
Krushi Seva Kendra । कृषी सेवा केंद्र सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीच अडचण
सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्यांनी हा व्यवसाय केला आहे. किमतीचा विचार केला तर एका पेटीचे भाडं दोन हजार आणि विक्री किंमत चार हजार इतकं आहे. मधापासून विविध उप पदार्थ तयार केले जातात. तसेच हे उत्पादन मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये देखील पुरविले जाते. त्यांची प्रगती खरोखरच कौतुकास्पद आहे, यातून बाकी शेतकरी देखील प्रेरणा घेतील.
Kharip Pik Vima । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार ६१३ कोटींची विमा भरपाई