Success Story

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

यशोगाथा

Success Story । शेती व्यवसाय करत असतानाच पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशींचे पालन करावे लागेल.

PMFME Scheme । शेतकऱ्यांनो, सोडू नका ही संधी! अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळत आहे १० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान

सध्या नोकरी मिळणे आणि ती टिकवणे अवघड बनले आहे. परंतु एका उच्च शिक्षित तरुणाने लाखो रुपये पगार असणारी नोकरी सोडली आहे. नोकरी सोडून त्याने पशुपालनाचा (Animal husbandry) निर्णय घेतला. आज त्याची सहा कोटींमध्ये उलाढाल आहे. गाझियाबाद येथील असीम रावत असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी अमेरिकेसह अनेक देशांत काम केले असून ते सॉफ्टवेअर इंजिनिअर होता.

Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक

..आणि सोडली लाखोंचा पगार असणारी नोकरी

त्यांना पगार देखील चांगला होता. परंतु, एकदा त्यांनी टीव्ही चॅनलवर गायींच्या संदर्भात चर्चा (Cow Farming) ऐकली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये नोकरी सोडून त्याच वर्षी त्यांनी दोन गायींसह व्यवसाय सुरू केला. आज त्यांची व्यवसायाची उलाढाल 6 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यांना म्हैस पालन आणि परदेशी गायी पाळायच्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी देशी गाई पाळण्याचा निर्णय घेतला.

Mulching Paper Subsidy । ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळत आहे प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ

या जातींच्या गाईंचे पालन

कारण या गाईच्या दुधात अनेक जीवनसत्वे आढळते. त्यांचे इतरही फायदे आहेत. देशी गाईचे फक्त दूधच नाही तर खत आणि गोमूत्रासाठीदेखील चांगल्या मानल्या जातात. त्यांच्या देखभालीसाठी जास्त खर्च येत नाही. त्यांच्याकडे गिर, साहिवाल, हिमालयीन बद्री देशी गायी आहेत. गाझियाबाद आणि बुलंदशहरमध्येही आपली डेअरी सुरु केली आहे. ते सेंद्रिय शेती देखील करतात.

Land Measurement । जमीन मोजणीसाठी किती खर्च येतो? अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शिवाय त्यांनी त्यांच्या डेअरीमध्ये 85 लोकांना रोजगार दिला असून ते आपली अनेक उत्पादने विकतात. त्यांना थेट ऑर्डर मिळतात आणि ते आपल्या वेबसाइटवर उत्पादन विकतात. त्यांची सर्व उत्पादने ई-कॉमर्स वेबसाइटवर मिळतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गायींची स्वच्छता आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली आहे. बैल आणि वासरांचीदेखील देखभाल केली जाते.

Milk Price । ऐन सणासुदीत पशुपालकांचं गणित बिघडलं! दुधाच्या किमती कमी आणि चारा महागला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *