Success Story

Success Story । काय सांगता! लसणाच्या शेतीतून शेतकरी बनला करोडपती, कसं केलं नियोजन

यशोगाथा

Success Story । अनेक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून निराश होतात. पण असेही काही शेतकरी आहेत ते शेतीतून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. जर तुम्ही शेती करणार असाल तर तुम्हाला योग्य ते नियोजन करावे लागेल. तर तुम्हाला शेतीतून चांगले पैसे मिळवता येतील. विशेष म्हणजे अनेक तरुण नोकरी सोडून शेती करत आहेत. (Farmer Success Story)

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

अशाच एका शेतकऱ्याने लसणाच्या शेतीतून (Garlic farming) करोडो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. सध्या देशात लसणाचे दर (Garlic rates) गगनाला भिडले आहेत. लसूण उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा फायदा होत आहे. देशातील अनेक भागात लसणाची लागवड (Garlic cultivation) केली जाते. मध्यप्रदेशात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात लसूण लागवड करतात. पण प्रत्येक वर्षी येथील शेतकऱ्यांचा लसणाचा उत्पादन खर्च निघतोच असे नाही.

Weather Update । वादळ आणि पावसामुळे हवामान बदलेल; ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, IMD ने जारी केला अलर्ट

लसणामुळे अच्छे दिन

पण यंदा येथील शेतकऱ्यांना लसणामुळे अच्छे दिन आले आहेत. यंदा लसणाचे दर प्रति किलो 400 रुपये पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातील लसूण उत्पादक शेतकरी कोट्याधीश झाले आहे. राहुल देशमुख (Rahul Deshmukh) या शेतकऱ्याने लसणाच्या लागवडीतून करोडो रुपये कमावले आहेत. या शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यात 13 एकर शेतात लसूण लागवड केली होती. त्यासाठी त्यांना 25 लाखांचा खर्च आला.

Milk Rate । दुध अनुदानाची संपली मुदत, आता होणार दुधात दरवाढ?

1 कोटीहून जास्त कमाई

यंदा त्यांना पाचपट जास्त कमाई करता आली आहे. सध्या लसणाची काढणी सुरु आहे. दर जास्त असल्याने लसणाची चोरी होत असल्याची घटना घडत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने काढणी न झालेल्या 4 एकर शेतासाठी सोलर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यांना आतापर्यंत 9 एकरातून 1 कोटीहून अधिक कमाई करता आली आहे.

पहा व्हिडिओ

या शेतकऱ्याला यंदा लसणाला इतका जास्त भाव मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. पण यावर्षी लसूण दरात अचानक वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे बाजार समित्यांमध्ये जास्तीत जास्त 80 रुपये किलो असणारा लसूण आज थेट 300 ते 400 रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Dairy Farming । आता म्हैसच सांगणार मी आजारी आहे, उद्या कमी दूध देईल; लवकरच येणार सेन्सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *