Success Story

Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा

यशोगाथा

Success Story । देशात जरी मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जात असली तरी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. कारण अनेकवेळा शेतमालाचे दर (Agricultural rates) घसरलेले असतात. या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय (Business with agriculture) करतात. यातून त्यांना चांगला नफा मिळवता येतो.

Milk Production । सावधान! आता फॅट काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर केली जाणार कारवाई

शेतीसोबत सुरु केली डाळ मिल

एका महिला शेतकऱ्याने शेतीसोबत गृह उद्योग सुरु केला आहे. ज्यातून त्यांना चांगली कमाई करता येत आहे. शांताबाई दादासाहेब खाकरे (Shantabai Dadasaheb Khakere) असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. त्या बीड (Beed) जिल्ह्यातील वाकनाथपूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी जोडव्यवसाय म्हणून डाळ मिल (Dal Mill) सुरु केली. पण व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नव्हते.

Cow Farming । काय सांगता! एका वेतात ‘ही’ गाय देते तब्बल 3,000 लिटर दूध, जाणून घ्या या गाईची वैशिष्ट्य

त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. याची माहिती त्यांनी आपल्या पतीला दिली. योजना चांगली असल्याने त्यांनी वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत बीड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्जाचा (Loan) प्रस्ताव दाखल केला. विशेष म्हणजे त्यांना चार लाख रुपयांचे कर्ज देखील मंजूर झाले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरु केला.

MGNREGA Budget 2024 । अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा! खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध होत राहणार

आज होतेय चांगली कमाई

या कर्जाच्या रकमेतून त्यांनी डाळ मिलसाठी लागणारे साहित्य आणि यंत्राची खरेदी केली. त्या या यंत्राद्वारे आजूबाजूच्या शेतकरी बांधवांकडून आणि गावातून कच्चा माल घेऊन त्यापासून डाळ तयार करतात. मूग डाळ, तूर डाळ अशा अनेक प्रकारच्या डाळी तयार करून शांताबाई आणि त्यांचे पती बाजारात त्यांची विक्री करतात.

Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक धडाकेबाज घोषणा!

शेतीसोबत केलेल्या जोड व्यवसायामुळे शांताबाईंना आता खर्च जाऊन प्रत्येक महिन्याकाठी चांगला नफा मिळत आहे. यातून त्या आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि कौटुंबिक खर्च भागवत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी व्यवसायातून चांगला मिळवत असल्याने त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! अनेक राज्यांमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत पावसाळा सुरूच राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *