Success story

Success story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न, कमी खर्चात मिळतंय जास्त उत्पन्न

यशोगाथा

Success story । शेतकरी आता नवनवीन पिकांचा प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. पूर्वी शेतीत फक्त पारंपरिक पिकांचं उत्पन्न घेतलं जायचं. पण प्रत्येक वर्षी शेतमालाला चांगला हमीभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता आधुनिक पिकांकडे (Modern crops) वळले आहेत.

Land Acquisition Act । काय आहे भूसंपादन कायदा? शेतकऱ्यांना त्याचा कसा होतो फायदा? जाणून घ्या

विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न

अलीकडच्या काळात शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry farming) करू लागले आहेत. यातून त्यांना चांगली कमाई करता येते. पण हल्ली शेतीतून जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर शेतकरी जास्त रसायनांचा वापर करतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर जास्त परिणाम होतो. पण सुरेश कोंडिबा गोरे या शेतकऱ्याने विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न (Toxic Free Strawberry Farming Patterns) राबवला आहे. इतकेच नाही तर त्यांना यातून जास्त फायदा झाला आहे. (Strawberry farming information)

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

१० गुंठ्यात मिळवलं भरघोस उत्पन्न

सुरेश कोंडिबा गोरे (Suresh Kondiba Gore) हे भोर (Bhor) तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील रहिवासी आहे. या शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती १० गुंठे एवढ्या कमी क्षेत्रात फुलवली आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्यासाठी त्यांनी राजेंद्र ढेबे यांचे मार्गदर्शन घेत बेड फार्मिंग प्रयोग केला.

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

विशेष म्हणजे सुरेश गोरे यांनी भाताची शेती म्हणून ख्याती असणाऱ्या या परिसरात नाचणीच्या शेतात रासायनिक खतांचा, औषधांचा वापर न करता सेंद्रिय आणि जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकवली आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी गोरे यांनी महाबळेश्वर येथील राजेंद्र ढेबे यांच्या नर्सरीमधून आर वन आणि नाबिला जातीची ७ हजार रोपे प्रतिरोप १५ रुपये प्रमाणे विकत आणली.

Havaman Adnaj । शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता, जाणून घ्या

स्ट्रॉबेरीच्या रोपांची लावणी करण्यापूर्वी जमिनीची व्यवस्थित खोल नांगरणी तसेच कुळवणी करून घेतली. गादी वाफ्यांवर दोन रोपांमधील अंतर ४५ सेंमी, तर दोन ओळींमधील अंतर ६० सेंमी ठेवून रोपांची लागवड केली. त्यावर शेणखत, जीवामृत, लेंडी खतांचा देखील वापर केला. ज्याचा त्यांना फायदा झाला.पाण्यासाठी विहीर आणि बोअरवेलचा वापर करून ठिबक सिंचनाची सोय केली. आजतागायत अडीच लाख रुपये खर्च करून तीन टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळण्याची शक्यता असून २०० रुपये किलोने सहा लाखांचे उत्पन्न निघेल.

Success Story । व्वा रे पठ्ठया! कपाशीला फाटा देत केली तुरीची लागवड, आज कमावतोय लाखो रुपये; कसे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *