Success Story

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! कॅन्सरग्रस्त पुणेकराने केली केशराची यशस्वी शेती, वर्षाला मिळतेय लाखोंचे उत्पन्न

यशोगाथा

Success Story । मनात जर जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतेही अशक्य काम चुटकीसरशी पार पडते. याचा प्रत्यय एका शेतकऱ्याला आला आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात शेतीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक तरुणवर्ग गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्याने त्यांना खूप मोठा आर्थिक लाभ देखील होत आहे.

Namo Shettale Abhiyan । पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राबवली जाणार नवीन योजना, शेततळ्यासाठी मिळणार पैसे

एरोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर

अनेक शेतकरी आता शेतीत केशर (Saffron) सारख्या पिकाचा यशस्वी प्रयोग करत आहेत. प्रामुख्याने काश्मीरमध्ये घेतले जाणारे पीक आता महाराष्ट्रातही घेतले (Saffron Cultivation) जात आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एका कॅन्सरग्रस्त शेतकऱ्याने केशरची लागवड केली आहे. गौतम राठोड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे लागवडीसाठी (Saffron Cultivation Information) त्यांनी एरोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांना लाखोंचा नफा होत आहे.

Sharad Pawar । मोठी बातमी! दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रतिकूल परिस्थितीवर केली मात

राठोड यांनी B.Com चे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी तळेगाव येथे आपले गॅरेज सुरु केले, सर्व काही सुरळीत असताना त्यांना अचानक कॅन्सर या जीवघेण्या रोगाने ग्रासले. त्यांच्या उजव्या किडनीमध्ये रक्ताचा ट्युमर आढळला. हा आजार दिवसेंदिवस वाढत चालला होता. अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी ट्युमर किडनीसह बाहेर काढला. त्यामुळे त्यांना कोणत्याही जड वस्तू उचलता येत नव्हत्या.

Havaman Andaj । राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

असे केले नियोजन

तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या एका मित्राने त्यांना केशर शेतीचा व्हिडिओ पाठवला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण केशर शेती करायची असे मनाशी पक्के ठरवले. १० बाय १२ फूट एवढ्या बंद खोलीत त्यांनी थेट काश्मीरहून बियाणे मागवून तीन महिने काळजी घेऊन उत्पादन घेतले. १० ते १२ मिमी लांब असणाऱ्या केशरची किंमत ८०० ग्रॅम आहे.

Go Green Scheme । सोडू नका अशी संधी! वीजबिलात मिळेल सवलत, असा घ्या लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *