Success Story । पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी हल्ली आधुनिक शेती (Modern agriculture) करत आहेत. याचा त्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत आहे. याशिवाय आधुनिक शेतीत शेतकरी नवनवीन प्रयोग करू पाहत आहे. नोकरीपेक्षा शेतीत जास्त कमाई करता येत आहे, त्यामुळे अनेकजण नोकरी सोडून शेती करत आहे. इतकेच नाही तर काहीजण शेतीसोबत जोडव्यवसाय (Agriculture business) देखील करत आहेत.
उत्तरप्रदेशातील रायबरेली येथील भोलेंद्र चौरसिया (Bholendra Chaurasia) या तरुणाला सैन्यात भरती व्हायचे होते. परंतु त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु त्याने हार न मानता शेती करण्याचा निर्धार केला. त्यांनी पान शेती (Leaf farming) करण्याचे ठरवले. पान शेतीमधून मागील तीन वर्षांपासून त्यांना वार्षिक 3 ते 4 लाख रुपयांची कमाई होत आहे. दरम्यान, रायबरेली जिल्ह्यात सध्या अनेक शेतकरी पान शेती करत (Leaf farming information) आहेत.
Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया
राज्य सरकारकडून दिले जाते प्रशिक्षण
महत्त्वाचे म्हणजे यासाठी राज्य सरकारकडून (State Govt) शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. विविध योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आल्या आहे. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. पान लागवड फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर करतात. यात प्रामुख्याने नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांमध्ये शेती केली जाते. यासाठी जमीन चांगली तयार करून, बेडवर पानाची लागवड करतात.
Milk rate । अर्रर्रर्र! दूध दरातून उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पानांच्या प्रजाती
पान शेतीसाठी देशी, बांग्ला (कलकत्ता) आणि महोबा या पानांच्या दर्जेदार प्रजाती आहेत. शेतात उत्पादित होणारे पान ते वाराणसी, फैजाबाद, लखनऊ आणि रायबरेली या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात. भोलेंद्र यांना लागवडीसाठी दीड बिघ्यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला असून पहिल्या वर्षी पान लागवडीतून काही उत्पन्न मिळत नाही. परंतु दुसऱ्या वर्षांपासून उत्पन्न सुरु होऊन त्यांना 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल
विशेष म्हणजे खाण्यासोबत पानाचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यामुळे पानाला विशेष मागणी असते. शिवाय राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी पान शेती यशस्वी करून दाखवली आहे. वास्तविक पाण्याच्या निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांना पानाचे गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
PM Kisan 16th Installment । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 16 वा हप्ता