Success Story । आपल्या सर्वांना शेतकऱ्यांनी शेतीमधून पिकवलेला पैसा दिसतो, मात्र त्यामागे केलेले त्याचे कष्ट दिसत नाही. शेतकऱ्यांना शेती करत असताना वेगवेगळ्या संकटांचा सामना हा करावाच लागतो. मात्र शेतकरी कधीही खचून जात नाहीत त्या संकटांवर मात देत आपले पीक फुलवत असतात. सध्या देखील बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याने विविध संकटांचा सामना करत आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. (Farmer Success Story)
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सरकार सोडणार तुमच्या खात्यावर पैसे
अनिल बडे असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने शेतामध्ये विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आणि ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. बीडचा भाग तसा दुष्काळी आहे आणि ड्रॅगन फ्रुटला देखील जास्त पाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुटची लागवड अतिशय फायदेशीर ठरतं आहे. शेतकरी अनिल यांनी देखील त्यांच्या शेतात ड्रॅगन फूड ची लागवड केली आणि त्यांनी दोन वर्षात ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीतून जवळपास 30 लाख रुपये कमावले आहेत.
Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस! काही पिकांना फटका तर काही पिकांना फायदा
याबाबत अधिकची माहिती अशी की, अनिल हे आजारी होते यावेळी त्यांना भेटण्यासाठी त्यांचे काही मित्र उस्मानाबाद वरून आले.या मित्रांनी अनिल यांच्यासाठी ड्रॅगन फ्रुट आणले होते. त्यानंतर हे फ्रुट पाहिल्यानंतर शेतकरी अनिल यांनी त्याची लागवड करण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी युट्युबवर याबाबतची सखोल माहिती घेतली आणि साडेचार एकरात ड्रॅगन फूडची लागवड केली.
Animal Fodder । शेतकऱ्यांना मिळत आहे कमी किमतीत जनावरांसाठी हिरवा चारा, जाणून घ्या ऑर्डर कशी करावी
खर्च किती आला?
माहितीनुसार अनिल बडे यांची गावांमध्ये तीस एकर जमीन आहे त्यांनी 27 जून 2021 रोजी अडीच एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. ज्यामध्ये त्यांना एकरी पाच लाख खर्च आला. त्यानंतर त्यांनी दहा बाय सात फूट जागेत पाच हजार रुपये लावली आणि त्यांनी पहिल्या वर्षात दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर त्यांनी अजून जास्त ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यामुळे त्यांना फायदा देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे.
Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, पहिला कंटेनर रवाना
अनिल बडे यांच्या मुलाने सांगितले की, आम्ही सुरत, रायपुर, नागपूर आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ड्रॅगन फ्रुट विकतो. दोन वर्षात तीस लाख रुपयांचा चांगला नफा झाल्याचे या शेतकऱ्याच्या पुत्राने सांगितले आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये आणखी मोठा नफा अपेक्षित आहे.
Havaman Andaj । आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ ठिकाणी अवकाळी बरसणार